सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
आजचे युग हे स्पर्धेचे युग असून प्रत्येक माणसाने मानव सेवा करताना निस्वार्थ पणे केली तर निश्चितपणे आनंद मिळतो असे विचार मानव सुरक्षा सेवा संघाचे संस्थापक महासचिव गजानन इंगळे यांनी केले
ते येथील भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात मानव सुरक्षा सेवा संघाच्यावतीने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड व वृक्षारोपण निमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय संस्थापक सचिव गजेंद्र भिसे व राष्ट्रीय कार्यकारिणी प्रमुख अरुण पांडव प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्ताविक मानव सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रवीण पऱ्हाड यांनी केले यावेळी राष्ट्रीय सचिव गजेंद्र भिसे, राष्ट्रीय प्रमूख अरुण पांडव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी भानुदास पवार यांची मानव सुरक्षा सेवा संघाच्या जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून तर रफिक कुरेशी यांची जिल्हा प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली यावेळी मुन्नाभाउ काळे जिल्हा मीडिया प्रमूख, भानुदास पवार जिल्हा कार्याध्यक्ष, रफीक कुरेशी प्रवक्ता बुलडाणा, प्रविण पऱ्हाड तालुकाध्यक्ष मेहकर, सुनील मोरे मीडिया प्रमूख मेहकर, प्रकाश सुखदाने सह प्रमूख मेहकर, लोणार कार्याध्यक्ष म्हणून शेख जावेद ,चिखली मीडिया प्रमुख म्हणून सागर ठाकरे, गणेश लहाने, अनिल पवार सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाचनालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनील मोरे यांनी केले यावेळी मेहकर आणि लोणार येथील मानव सुरक्षा सेवा संघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











