अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी येथील धिरज बबनराव देशमुख या तरुणाच्या बँक खात्यात चुकीने आलेले पन्नास हजार रुपये त्यांनी प्रामाणिकपणे परत करून अजुनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.मेडशी येथील सुस्वभावी,होतकरू, प्रामाणिक तरुण धिरज बबनराव देशमुख मालेगाव येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत गेल्या सात वर्षांपासून रोजंदारीवर कामाला आहे.धीरज देशमुख यांच्या प्रामाणिकपणाचा प्रत्येय वेळोवेळी आलेला असल्याने धिरज खातेदाराच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मेडशी येथुन जवळच असलेल्या उमरवाडी येथील गजानन उत्तम खुळे सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव येथीलव नायब तहसीलदार महेश लांडगे यांना धिरज देशमुख यांच्या गुगल पे वर पन्नास हजार रुपये पाठविण्यास सांगितले आणि गुगल पे नंबरही पाठविला.लगेच लांडगे यांनी पन्नास रुपये पाठवूनही दिले मात्र येथे मोठी गफल्लत झाली शेगावच्या धिरज देशमुख यांच्या बँक खात्यात ती रक्कम जमा न होता ती रक्कम मेडशी येथील धीरज देशमुख यांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाईल मध्ये धीरज देशमुख या नावाने दोन नंबर सेव्ह असल्याने खुळे यांची गफल्लत झाली.खुळे यांनी लगेच मेडशी येथील धीरज देशमुख यांना संपर्क साधुन झालेली हकीकत सांगितली.धीरज देसमुख यांनी तुमचे पैसे कोठेही जाणार नाहीत माझ्या खात्यात आले ते सेफ आहेत.तुम्हाला लगेच पैसे पाठवून देतो म्हणत धीरज ती रक्कम लगेच परत करून प्रामाणिकपणाचा परिचय करून दिला. धीरज देशमुख यांनी यापूर्वीही खात्यात चुकीने आलेले पाच हजार रुवये परत केले होते. धीरज हा लहानपणापासूनच प्रामाणिक आहे.लहान वयात धिरजचे पितृछत्र हरविले आहे. आईने काबाडकष्ट करून संगोपन करून त्यांच्यावर चांगले संस्कार घडविले आहे. धिरज देशमुख यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.











