अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांची मागणी.
महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि२५. : बाजारा मध्ये कोणतीही वस्तु अथवा औषधि विकत घेतांना आपण एम.आर.पी. (MRP) बघतो. एम.आर.पी. (Maximum Retail Price) म्हणजे जास्तीत जास्त किरकोळ किंमत. कोणता दुकानदार एम.आर.पी. भावाने वस्तु विकतो तर दुसरा दुकानदार तीच वस्तु एम.आर.पी. पेशा कमी भावाने विकतो. बाजारामध्ये एकाच कंपनीच्या वस्तुच्या वेगवेगळ्या दुकाणामध्ये वेगवेगळी किंमत कशी असु शकते?याच कारण आहे एम.आर.पी. एखादी वस्तु जास्तीत जास्त भावाने विकण्याचे दुकानदाराला स्वातंत्र्य. यावरून अस लक्षात येते की, वस्तुंची खरी किंमत ही खुप कमी असते, ज्याची ग्राहकाला कल्पनाच नसते.
म्हणुन प्रत्येक वस्तु जी बाजारामध्ये विकत मिळते त्यावर वस्तुची उत्पादन किंमत (Manufacturing Rate), त्यावर लागणारा वस्तु आणि सेवा कर (Good and Service Tax) आणि वस्तु वरिल दुकानदाराचा नफा (Profit Rate) हे छापणे अनिवार्य केले पाहीजे.असे झाले तर बाजारामध्ये एकाच कंपनीच्या वस्तुच्या वेगवेगळ्या दुकाणामध्ये वेगवेगळी किंमत राहणार नाही. यामुळे ग्राहकाची फसवणुक होणार नाही. दुकानदाराला छापील किंमतीनेच वस्तु विकावी लागेल. म्हणुन अखिल भारतीय ग्राहक पंचायत भद्रावती यांच्या कडुन वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, नवी दिल्ली यांना पत्राव्दारे मागणी करण्यात आली आहे.अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे माजी सचिव अविनाश जोशी यांच्या मार्गदर्शनात वसंत वर्हाटे, वामण नामपल्लीवार, पुरूषोत्तम मत्ते, अशोक शेंडे आणि प्रविण चिमुरकर यांनी या कार्याला नविन स्वरुप देऊन, ग्राहकांच्या हितासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुशजी गोयल यांच्याकडे मागणी केली आहे.