सिद्धोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २६ डिसेंबर २०२३ बीड जिल्ह्यात खळबळ जनक घटना उघडकीस येत असून याप्रकारे जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्याचे मत जिल्ह्यातील नागरिकांतून येत आहे. जिल्हा प्रशसनाच्या भोंगळ कारभारामुळे आणि हगर्जीपणामुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यतील ग्रामस्थांनी गावातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात तक्रार करत गावातील योजना फक्त कागदावरच राबल्याच्या दाखवत अक्षशः गावच विक्रीला काढल्याचे समोर आले आहे तर बीड जील्हातीलच आष्टी पाटोदा मतदार संघामधील भूमिअभिलेख नकाशा वरील चक्क रस्ते गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील गावांमध्ये सरकारी रस्ते तयार केले आहेत तसेच तालुक्यातील पाटबंधारे विभागाने अनेक ठिकाणी कालवे तयार केले आहेत कलव्या शेजारील रस्ते सर्विस रोड, आनंद रोड, शिव रस्त्यांवर अतिक्रमण केल्याने सामान्य नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आष्टी तालुक्यातील अनेक गावांमध्ये नकाशावरील रस्ते गायब झाले असून हा प्रकार
तालुक्यातील महसूल विभागात काम करणारे अधिकारी चुकीचे आदेश काढत आहेत या प्रकारामुळे शेतकऱ्या मध्ये वादा वाद निर्माण होत आहे. बीड जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन आणि जिल्हाधिकारी कर्मचारी अश्या परिस्थितीत या घटनानाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे मत नागरिकांतून येत आहे.