सिद्धोधन घाटे
जिल्हा प्रतनिधी बीड
बीड : दि. २७ डिसेंबर २०२३ बीड जिल्हा आरोग्य केंद्र आणि परळी वैजनाथ पण पंचायत समिती अंतर्गत जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात असणाऱ्या परळी वैजनाथ नागरी आरोग्य केंद्राचा भोगळ कारभार उघड झाला असून या घटनेने परळी वैजनाथ आरोग्य अधिकारी कर्मचऱ्यांचा मनमानी कारभार झाला असून त्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील सामान्य नागरिक मात्र उपचारपसून वंचित राहत आहेत. या आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर आरोग्य केंद्रात येत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे. या आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आणि नऊ कर्मचारी असून त्यांनी रोज आरोग्य केंद्रात हजर झाले पाहिजेत परंतु हे अधिकारी आणि कर्मचारी आठवड्यातील चार चार दिवस वेगवेगळ्या गटाने येतात करचारी आणि अधिकारी यांच्यात संगनमत करून दोन गट तयार करण्यात आले असून ते त्यांच्या ठरलेल्या दिवसाप्रमाणे आरोग्य केंद्रात हजेरी लावतात तसेच रोज दुपारच्या नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र बंद ठेवत असल्याचेही मत नागरिकांतून येत आहे. त्याचबरोबर कर्तव्यात बेजबाबदारपणा हलगर्जीपणा करत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपसून परळी वैजनाथ शहरातील आरोग्य केंद्राचा भोंगळ कारभार चालू असून या प्रकारामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिक त्रस्त असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून येत होत्या येथील अधिकारी आणि कर्मचारी उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांचा उपचार तर करतच नव्हते परंतु त्यांना बोलण्याची भाषा आणि वर्तणूक अतिशय उर्मट असल्याचे नागरिकांतून येत आहे. तसेच या नागरी आरोग्य केंद्रात असलेल्या रक्त तपासणी केंद्राच्या मशीन आणि उपकरणे बंद असल्याचे सांगत रुग्णांना खाजगी दवाखान्यात रक्त तपासणी करण्याचे सल्ले येथील कर्मचारी देत असल्याचे मत नागरिकांतून येत आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागवार पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.


