शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
११३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
सेलू : सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवानिमित्त वैयक्तिक स्पर्धा (ता.२५) वार सोमवार रोजी साई नाट्य मंदिर येथे पार पडली.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या डॉ. सविता रोडगे, अस्मिता मोरे, भाग्यश्री बोराडे, शालिनी ताठे, रश्मी जाजू, रुचिता गुप्ता, अर्चना रोडगे, द्रोपदी परकड, डॉ अपूर्वा रोडगे, दै. लोकमतचे रेवनअप्पा साळेगावकर, डॉ. सूवर्णा नाईकनवरे, राठी, परिक्षक दुर्गा मेहता, सुप्रिया गंधम, प्रशासकीय अधिकारी महादेव साबळे, प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला, शालिनी शेळके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेची सुरुवात द्विप्रज्वलनाने करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने प्राॅस्परस पब्लिक स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, एल के आर आर प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील एकूण ११३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळावा या उद्देशाने या वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या गीताचे उत्कृष्ट पद्धतीने सादरीकरण करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
प्राॅस्परस पब्लिक स्कूल मधुन वैयक्तिक नृत्य स्पर्धेत अ गटातुन संतोषी मिटकरी प्रथम, समृद्धी शिंदे द्वितीय, स्वरा बरसाले तृतीय व आर्या ताठे उत्तेजणार्थ क्रमांक मिळविला. ब गटातून श्रावणी कवळे प्रथम,दुर्गराज ताठे द्वितीय, भागवत कदम तृतीय, सुजित मिटकरी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला.प्रिन्स इंग्लिश स्कूल मधून इयत्ता पहिली मध्ये आनंदी डासाळकर प्रथम, आद्या खजिने द्वितीय, रोहित बोकन तृतीय, इयत्ता दुसरी मधून अरहंत सरकटे प्रथम, तनिष्का पाटील द्वितीय,प्रज्ञेश गायकवाड तृतीय, इयत्ता तिसरी मधून समर्थ सुरवसे प्रथम, समीक्षा दास द्वितीय, वैष्णवी कडभाने तृतीय, इयत्ता चौथी मधून भार्गवी जानकर व अक्षराबाबत प्रथम, दीतिका जाजू व स्वरा कांबळे द्वितीय, अंशिका चौरे व विराजपौळ तृतीय, इयत्ता पाचवी मधून प्रेक्षातम शेट्टी व कौस्तुभ शेळके प्रथम, परिधी शर्मा द्वितीय, इयत्ता सातवी श्रीचीता गवळी प्रथम ईश्वरी पौळ द्वितीय आणि रिधीशा जाजू इयत्ता सातवी मधून सोनू कोकाटे प्रथम यांनी क्रमांक मिळविला.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका पडोळे यांनी केले.