शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सुप्रसिद्ध विनोदी मराठी वेबसिरीज चांडाळ चौकटीच्या करामतीचे कलाकार सेलूत.
सेलू(प्रतिनिधी):साई बाबाचे गूरू श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रेनिमित्त शहरात आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतिने केशवराज बाबासाहेब महाराज यात्रा महोत्सव निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्रशाला, नूतन रोड सेलू येथे आयोजित करण्यात आले आहे. सेलू हे सांस्कृतिक शहर असून हा सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने हे प्रथम वर्षी उचललेले पाऊल असून इथून पुढेही अशाच प्रकारचे सांस्कृतिक महोत्सव घेऊन शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आमदार सौ. मेघना दीदी साकोरे बोर्डीकर यांचा प्रयत्न आहे. गूरूवार दि.२८ रोजी महाराष्ट्रात सर्वत्र धुमाकूळ घालत असलेली सुप्रसिद्ध अशी विनोदी आणि अनेक चालू ग्रामीण घडामोडीवर भाष्य करणारी,अनेक प्रश्नांना वाचा फोडणारी, जवळपास दोनशे पन्नास एपिसोड पूर्ण करणारी अस्सल ग्रामीण मराठी मध्ये असलेली तुफान विनोदी वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती या कार्यक्रमाची मेजवानी सायंकाळी ६ ते ८ यावेळेत तर शूक्रवार २९ रोजी श्री हभप केशव महाराज उखळीकर यांच्या किर्तनाचे आयोजन सायंकाळी ६ ते ८ यावेळेत करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या श्रावणाचा आनंद घेण्याचे अवाहन संयोजक आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी केले असून या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अँड.दत्तराव कदम,शंकर भोंडवे, कपिल फूलारी,गणेश काटकर,बाळू काजळे, सतीश धानोरकर अकरणारी,भोरे,गणेश सवणे,संदिप बोकन ,गोविंद शर्मा,अभय महाजन,प्रकाश शेरे,मयूर वाघ ,भागवत दळवे, अमोल भोसले,अनिल पवार, अजय डासाळकर, भारत इंद्रोके,शूभम खंदारे, अविनाश गायकवाड आदी पूढाकार घेऊन महोत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


