संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर -सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिंव्ह सोसायटी ली.मुंबई या संस्थेच्या इंदापूर शाखेचा सभासद सहकार प्रशिक्षण व पाल्य गुणगौरव समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदापूर येथे विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात अभ्यासा बरोबरच शरीर संवर्धनाकडे लक्ष द्यावे माहिती तंत्रज्ञान युगात हालचाली कमी झाल्या तसेच शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यासाठी अभ्यासाबरोबरच शरीर संवर्धनाकडे लक्ष द्यावे असे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रामराव पाडुळे होते.त्यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.संस्थेच्या प्रगतीचा आढावा तज्ञ संचालक गुलाबराव गवळे यांनी घेतला.कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संचालक प्रमोद देशमुख यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती सांगितली.पालक संचालक तुकाराम बेनके यांनी सभासदांचे स्वागत करुन सभासदांच्या तक्रारीचे निवारण केले.कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुभाष गायकवाड,कोरटकर सर,शरद झोल ,बळवंत निंबाळकर,विलास गाढवे सर, अमिन मुल्ला सर,बंडू जाधव सर,अशोक जाधव सोमनाथ कोळी खजिनदार सतेश शिंदे,सहसचिव सतीश माने
बहुसंख्य सभासद व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रभारी शाखा प्रमुख वृशाली कदम,दिलीप फापाळे,ऋषिकेश माने यांनी विशेष परीश्रम घेतले.विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलराव गुरगुडे यांनी तर आभार उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी मानले.