कासार्डे माध्य.विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्घाटन
संजय भोसले
तालुका प्रतिनिधी ,कणकवली
ऑलिंपिक स्पर्धेचा पाया हा खऱ्या अर्थाने शालेय स्तरापासून सुरू होतो, त्यामुळे प्रत्येक शाळेत ‘वार्षिक क्रीडा महोत्सव आणि वार्षिक क्रीडा स्पर्धांचे मोठ्या थाटात आयोजन केले जाते.कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डे, या प्रशालेत शैक्षणिक वर्ष सन-२०२३/२४ यावर्षीचा
“वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन प्रशालेच्या मैदानावर करण्यात आले आहे. “क्रीडा ज्योत दौड करून स्पर्धेचे शानदार उद्घाटन केले.”यावर्षी जिल्हा ,विभाग तसेच राज्यस्तरीय विविध स्पर्धेत प्रथम आलेल्या ज्युदो,कराटे, कुस्ती,योगा,वूशू,आट्यापाट्या ,स्क्वॅश व मैदानी स्पर्धेतील प्रथम क्रमांक तसेच विजेत्या संघांचे कर्णधार एकुण३५ गुणवंत खेळाडूंच्या हस्ते यावर्षी प्रथमच “क्रीडा ज्योत दौड” करण्याचा मान खेळाडूंना देण्यात आला त्यानंतर तीन खेळातील जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम तसेच राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविलेला विद्यालयचा इ.८वी ब मधील स्टार खेळाडू कु.अमोल दिपक जाधव याच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर यांच्याकडे क्रीडा ज्योत देण्याचा मान देण्यात आला.सन्मा.प्रमुख पाहुणे अरविंद कुडतरकर यांनी खेळाडुकडुन मिळालेल्या क्रीडा ज्योतीने मुख्य क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून या स्पर्धेचे शानदार उद्घाटन केले.तर प्रशालेचे मुख्याध्यापक एन.सी.
कुचेकर यांच्या हस्ते
मैदानावर श्रीफळ वाढवून मैदानाचे पूजन करण्यात आले याप्रसंगी व्यासपीठावर प्र.मुख्याध्यापक एन.
सी.कुचेकर,प्र.पर्यवेक्षक एस.डी.भोसले, जेष्ठ शिक्षक- शिक्षिका सौ.बी.बी.बिसुरे,क्रीडा विभाग प्रमुख तथा विद्यालयचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड व इतर सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत विद्यालयचे मुख्याध्यापक एन.सी कुचेकर आणि क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.खिलाडूवृत्तीने खेळ खेळा -: अरविंद कुडतरकर,यांचे आवाहन.मैदानावर तुम्ही सतत सराव करत असताना गळत असलेला घाम हिच तुमची भविष्यातील खरी संपत्ती असून कोणताही खेळ खिलाडूवृत्तीने खेळत आनंद मिळवा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी करताना खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या. तत्पूर्वी उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय मारकड यांनी करताना खेळ, क्रीडा स्पर्धा आणि करिअर यावर प्रकाशझोत टाकत कोणत्याही खेळात हार किंवा जीतचा विचार न करता स्पर्धेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन वार्षिक क्रीडा स्पर्धेचा आनंद लुटण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले. आपला अध्यक्षीय भाषणात मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक एन.सी. कुचेकर यांनी यावर्षी विविध क्रीडा प्रकारात जिल्हा , विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्या, विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडुंचे विशेष कौतुक केले आणि कासार्डे विद्यालयातील क्रीडा शिक्षक तसेच सर्वच शिक्षकांच्या कठोर मेहनतीमुळे कासार्डे विद्यालय हे जिल्हृयाची क्रीडा पंढरी म्हणून ओळखले जात असल्याचे गौरवोद्गार काढले.
शेवटी विद्यालयाचे प्र.पर्यवेक्षक एस.डी. भोसले यांनी आभार मानून उद्घाटन सोहळ्याची सांगता केली.
सलग तीन दिवस विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती क्रीडा विभाग प्रमुख दत्तात्रय मारकड यांनी दिली.