फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या व सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या ओतूर नगरीत काल काशी विश्वेश्वर पायी पालखी सोहळ्याची आयोजनाची व नियोजनाची सभा हरिभक्त परायण गंगाराम महाराज डुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. हे या पालखी सोहळ्याचे विसावे वर्ष आहे.
सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांनी तीर्थक्षेत्र ओतूर या ठिकाणाहून निघत काशीविश्वेश्वरापर्यंत आपली वारी पूर्ण करून तिथे कीर्तन केले. आणि सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या नावाने शिवजन्मभूमीच्या ओतूर मधून सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराजांच्या नावाने ही पालखी 2004 या वर्षा पासून सुरु झाली. ही पालखी भारत देशातील पहिली पालखी आहे की जी दोन हजार किलोमीटरचे अंतर 70 दिवस पायी प्रवास करून महाशिवरात्रीला काशी विश्वेश्वराच्या दर्शनास पोहचते. महाराष्ट्र सह मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश असा प्रवास करणारी ही देशातील पहिली वारकरी पायी पालखी आहे.
यावर्षी या पालखीचे हे विसावे वर्ष असल्याने त्याचे आयोजन व नियोजन कालच्या सभे मध्ये अतिशय सुंदरपणे करण्यात आले. याप्रसंगी काशी विश्वेश्वर पायी पालखी सोहळ्याचे संस्थापक गंगाराम महाराज डुंबरे यांनी सभेपुढे आपले सर्व आयोजन व नियोजन सांगितले. संस्थेचे अध्यक्ष गणपत शेठ डुंबरे यांनीही आपल्या सर्व भाविक बंधू-भगिनींना नियोजन देऊन सभेला मार्गदर्शन केले.
या सभेसाठी बबनराव भोरे ' नरेंद्र तांबे, संतोष फापाळे, किसनराव फापाळे, सुभाष गाढवे, लक्ष्मण घुले, सिताराम तांबे, धोंडीभाऊ महाराज पानसरे, वसंतराव तांबे, शरदराव गाढवे, श्रीराम पाटील डुंबरे, रामदास गाढवे, बाजीराव बोचरे, विमल काशीद, मीनाक्षी लाहोरकर, अशोकराव फापाळे, हरिभाऊ फापाळे, सुदामराव घोलप, बबनराव डुंबरे आधी सर्व मान्यवर उपस्थित होते.











