विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : उमरखेड तालुक्यातील एक लढवय्ये व्यक्तिमत्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच आक्रमक अशी भूमिका घेणारे रवी जैन यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्ष जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या हस्ते निवड करण्यात आली. गेली अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत संघर्ष करीत आहे स्वाभिमानीच्या लढ्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि यापुढेही शेतकऱ्यांसाठी शेतकरी संघटनेचा लढा चालूच राहील आपणही या चळवळीत सहभागी झालात आणि शेतकरी हिताचे कार्य आपल्या हातून खडेल अशी अपेक्षा संदीप जगताप यांनी व्यक्त केली या अगोदरही रवी जैन यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठमोठे आंदोलन करून शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांना आज यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी कार्य करण्याची संधी दिली.