पोलिसांकडून तब्बल दोन हजार लिटर कच्चे रसायन व १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल केला नष्ट
सुरेश हिरवे
तालुका ग्रामीण प्रतिनिधि. श्रीगोंदा
श्रीगोंदा
सध्या म्हशीचे गोठे, शेतीकाम च दारूच्या हातभट्टीवर मानवी तस्करी करून आणलेल्या पीडितांची सुटका करण्याची मोहीम बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे व पोलिस कर्मचारी राबवत आहेत. आतापर्यंत १९ पीडितांची सुटका संजय ठेंगे व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मानवी तस्करीचे मुळ अवैध दारुच्या हातभट्टी व म्हशीचे गोठे आहेत. हेच मुळ नष्ट करण्याची मोहीम हाती घेत बेलवंडी पोलिसांनी शनिवार दि. २३ रोजी घोड नदीकिनारी असलेल्या दाणेवाडी, गोपाळवाडी येथील अनेक अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर छापे टाकून तब्बल २ हजार लीटर कच्चे रसायन व १ लाख रुपयांचे दारू काढण्याचे साहित्य नष्ट केले आहे. तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या कारवाईत आरोपी भाऊसाहेब अंबर गव्हाणे (रा. गोपाळवाडी, दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्या गावठी हातभट्टीवरुन ४०० लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल व आरोपी सागर अशोक गव्हाणे (रा. गोपाळवाडी, दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्या हातभट्टीवर मुद्देमाल १००० लिटर कच्चे कच्चे रसायन व ५० हजार रुपये रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी भाऊसाहेब माणिक गव्हाणे (रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याच्या हातभट्टीवर ६०० लिटर कच्चे रसायन व ३० हजार रुपयांचा मुद्देमाल असे एकूण २००० लिटर
कच्चे रसायन व १ लाख रुपये किंमतीचे दारू काढण्याचे साहित्य बेलवंडी पोलीसांनी नष्ट करून या तिघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आहेत. पुढील तपास निरिक्षक ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निरीक्षक मारूती कोळपे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक
राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद बाखारे यांच्या मार्गदर्शनाखली बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार मारुती कोळपे, मुख्य हवालदार नंदकुमार पठारे, भाउसाहेब यमगर, महिला पोलिस अविंदा जाधव, श्रीमती माने, कैलास शिपनकर, संदिप दिवटे, सतिष शिंदे, विकास सोनवणे यांच्या पथकाने केली आहे.