विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : येथे संत सावता माळी नागरी पतसंस्थेचा तिसरा वर्धापन दिन अनंतरावजी देवसरकर सभागृह या ठिकाणी पार पडला यावेळी संस्थेच्याव्यवहाराचा लेखाजोखा मानण्यात आला उमरखेड येथील शाखेने दोन कोटीचा टप्पा पार केला असून यामध्ये एक कोटी 44 लाख रुपयाचा कर्जवाटप बाकी भाग भांडवल असल्याचे संस्थेचे व्यवस्थापकी अध्यक्ष बोरगडे सर यांनी सांगितले मागील अनेक वर्षांचा संस्थेचा प्रवास कशा प्रकारे झाला या गोष्टीचा संपूर्ण परिचय संत सावता माळी चे संस्थापक अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी सांगितले अनेक शेर सभासदांनी आमच्या पतसंस्थेवर दाखविलेला विश्वास आम्ही पूर्णत्वास नेण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे मत बोरगडे सर व जाधव सर यांनी सांगितले यावेळी अनेक ठेवीदारांचे सत्कार करण्यात आले प्रथमतः 2008सली पुसद या ठिकाणी एका छोट्याशा खोलीमध्ये पत संस्थेच्या कार्याला सुरुवात झाली आणि आज बघता बघता आपल्या पतसंस्थेच्या पाच शाखा झाल्या कधी कळत नाही असे त्यांनी यावेळी सांगितलं यापुढे आपल्याला जिल्हा बाहेर सुद्धा आपल्या संस्थेचा विस्तार करायचा आहे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ लाहोरे हे होते प्रमुख उपस्थिती विना कदम पी एन देशमुख पाटणकर मॅडम उपस्थित होते या कार्यक्रमाला संस्थेचे ठेवीदार व सभासद उपस्थित होते यावेळी संस्थेच्या नवनियुक्त संचालक मंडळाचे सत्कार समारंभ करण्यात आला नवीन व्यवस्थापन समिती सदस्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला ठेविदाराचा सत्कार मुनाफा वाटप बँकेचा अहवाल वाचून दाखवण्यात आला. संस्थेला झालेला नफा बघून अनेकांनी यावेळेस संस्थेची निवडणूक लढविण्याचे ठरविले होते पण त्यांचा तो लढा यशस्वी झाल्या नसल्याचे मत संस्थापक अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितले.











