वसंता पोटफोडे
शहर प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव:२५/१२/२०२३
रावेरी येथील रमेश चोखाजी चंदनखेडे व दिवाकर चोखाजी चंदनखेडे हे दोघे बंधु राळेगांव येथे पंचायत समिती समोर गेल्या २०/१२/२०२३पासुन उपोषणाला बसले होते. चंदनखेडे बंधुच्या व त्यांच्या मोहल्यातील गावकरी यांचा रहदारीचा रस्ता हा बुद्धी पुरस्पर राजू झाडे नामक इसमाने अतिक्रमण करून बंद केला होता. यापूर्वी हा रस्ता बैलबंडी जाण्यायेण्यापुरता मोकळा करून देण्यात यावा अशी विनंती अर्ज चंदनखेडे बंधूनी ग्रामपंचायत रावेरी तसेच पंचायत समिती राळेगांव यांचेकडे केला होता परंतु तत्पूर्वी कुठल्याही प्रकारची दखल दोन्ही कार्यालयाकडून घेतली गेली नाही. नाईलाजाने चंदनखेडे बंधुला उपोषणाला बसावे लागले. वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष मा. विकास भाऊ मुन यांनी वंचित बहुजन आघाडी ची तालुक्याची व शहराची टिम घेऊन उपोषण मंडपाला भेट देऊन चंदनखेडे बंधुची विचारपूस केली. यावेळी रावेरी येथील सरपंच, विस्तार अधिकारी व ग्रामसेवक साहेबांसी मोबाइल फोन वरून सल्ला मसलत करून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून देण्याविषयी चर्चा झाली. सरपंच, ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी साहेब यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे आश्वासन दिले. आश्वासनानंतर चंदनखेडे बंधुना समज घालून स्वतः च्या तब्येतीची काळजी घ्यावी व उपोषण मागे घ्यावे अशी विनंती वंचित बहुजन आघाडी च्या सर्व कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर दुपारी २वाजता चंदनखेडे बंधूनी पोलीसउपनिरीक्षक गायकवाड साहेब व वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संघटक डॉ. ओमप्रकाश फुलमाळी सर यांच्या हस्ते नींबू सरबत पाजून उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाउपाध्यक्ष धनराज लाकडे, तालुका अध्यक्ष विकास मुन, तालुका महासचिव प्रकाश
कळमकर, शहर अध्यक्ष दिपक आटे, कायदेशीर सल्लागार ॲड. मधुसूदन अलोणे,युवा अध्यक्ष दिनेश धनविज, युवा महासचिव सुनील ढोरे, उपाध्यक्ष दिपक दिवे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर लोहवे, प्रशांत ताकसांडे, अमोल मगर,उपसरपंच झोटिंग नितेश चंदनखेडे, प्रशिक चंदनखेडे तसेच पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.