सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
धडगांवला गणेश पराडके यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार आमश्या पाडवी जि. प. सभापती गणेश पराडके, विविध संघटनेचे आदिवासी महासंघ कार्यधक्ष हिरामण पाडवी, अक्कलकुवा शेतकरी सह. संघाचे चेअरमन पृथ्वीसिंह पाडवी, शिवसेनेचे तालुका प्रमुख मगन वसावे, उपप्रमुख तुकाराम वळवी, धडगांव तालुकाप्रमुख महेश पाडवी, हे उपस्थित होते. आमदार आमश्या पाडवी १३ व १४ जानेवारीला युवा संमेलनाची रूपरेषा व उद्देश सांगितला युवक, समाज बांधवांना उपस्थित रहावे असे आवाहन केले. गणेश पराडके, हिरामण पाडवी यांनी मार्गदर्शन केला.











