भारत भालेराव
तालुका प्रतिनिधी,शेवगाव
शेवगाव: शालेय स्तरावरील गणित विज्ञान प्रदर्शनामुळे भावी वैज्ञानिक तयार होत असतात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन जागृत व्हावा या उद्देशाने शालेय,तालुका,जिल्हा व राज्यस्तरावर गणित- विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणे महत्त्वाचे ठरते.विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेला आळा घालून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा असे प्रतिपादन शेवगाव तहसिलचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी केले.ते आज आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेवगाव येथे आयोजित गणित- विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.सांगडे पुढे बोलताना म्हणाले की अशा शालेय स्तरावरील प्रदर्शनामुळे भावी पिढीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध डॉ.भारत वीरकर होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे आपल्या मनोगतात म्हणाल्या की,विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच शालेय स्तरावर गणित विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते,या संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे.तसेच शालेय प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्यास अनेक शास्त्रज्ञ या देशाला मिळतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड यांनी केले.शिक्षक मनोगत व्यक्त करताना अविनाश भागवत यांनी प्रदर्शन आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. या प्रदर्शनामध्ये एकूण गणित व विज्ञान विषयाचे मिळून 305 एवढी उपकरणे,उत्कृष्ट,मॉडेल्स याचे सादरीकरण केले.विजेत्या बालवैज्ञानिकांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी विद्यालयत चालवल्या जाणाऱ्या आय.बी.टी.विभागामार्फत आरोग्यदायी भेळ, पाणीपुरी, वडापाव,याचे स्वनिर्मित स्टॉल लावण्यात आले होते. या उपक्रमांमधून एकूण 35 हजार रुपयांची कमाई अवघ्या तीन तासात झाली.या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान-गणित शिक्षक अविनाश भागवत,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, रागिणी लबडे,वैशाली धोंडे,सुरज लबडे,स्मिता खळेकर,विकास भोसले,भानुदास बांडे,योगेश तायडे,स्वाती शहाणे,ऋतुजा बडे, योगिता औटी,स्वाती गरड यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व बाल वैज्ञानिकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड.डॉ.विद्याधरजी काकडे जि.प. सदस्या सौ.हर्षदाताई काकडे, विश्वस्त पृथ्वीसिंहभैया काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ,प्राचार्य संपत दसपुते,उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षक सुनील आव्हाड व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कौतुक केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)