अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी, उमरखेड
शिक्षण विभाग पंचायत समिती उमरखेड व स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ व २२ डिसेंबर २०२३ रोजी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा येथे करण्यात आले होते. सदर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ॲड. संतोष जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानी स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा चे अध्यक्ष डॉ नरेश गंदेवार, प्रमुख पाहुणे म्हणून सचिव विजय जयस्वाल, शाळेचे प्राचार्य मैत्रेय देशमुख आदि उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन त्यांच्या कला गुणांचे प्रदर्शन व्हावे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून दरवर्षी शिक्षण विभागाद्वारे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते.यावर्षीचे आयोजन हे स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा येथे करण्यात आले होते.’विज्ञान समाजासाठी’ हा यावर्षी चा थीम असून तालुक्यातील एकूण ९४ शाळांनी यात सहभाग नोंदविला होता.यात एकुण तीन गट होते. यामध्ये सामान्य गट, आदिवासी गट व शिक्षक गट यांचे वेग वेगळे प्रकल्प होते. यामध्ये सामान्य गटातून (उच्च प्राथमिक वर्ग ६ ते ८ मध्ये) प्रथम क्रमांक मॉडर्न पब्लिक स्कूल उमरखेड ची विद्यार्थिनी कु. विभावरी देवसरकर हिचा आला असुन द्वितीय गुरुदेव गोरोबा विद्यामंदिर उमरखेड चा विद्यार्थी शेख आहान तर तृतीय क्रमांक ज्ञानज्योती इंग्लिश मिडीयम स्कूल ढाणकी चा विद्यार्थी सत्यम कोठारी यांनी मिळवलं आहे.सामान्य गट ( माध्यमिक, उच्च माध्यमिक वर्ग ९ ते १२ मध्ये) प्रथम क्रमांक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, उमरखेड चा विद्यार्थी सोहम नी. जाधव, द्वितीय क्रमांक स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल हरदडा ची विद्यार्थिनी कु. युगा देशमुख, तर तृतीय क्रमांक स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालय, ढाणकी चा विद्यार्थी हर्षद जी. मोटाळे मिळवला आहे.आदिवासी गटातून सुद्धा विद्यार्थ्यांचे प्रकल्प होते. यामध्ये आदिवासी गट ( प्राथमिक ६ ते ८ व माध्यमिक व उच्च माध्यमिक गट ९ ते १२) या दोन्ही गटात दयानंद सरस्वती विद्यालय, निंगणुर या शाळेच्या दोन्ही विद्यार्थ्यांनी अनुक्रमे कुलदीप सिंह शेखावत व काजल जाधव आदींनी वेग वेगळ्या गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केले.शिक्षक गट ( उच्च प्राथमिक) मधून जिल्हा परिषद मुलांची शाळा, उमरखेड च्या शिक्षिका प्रियंका वानखेडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर उच्च माध्यमिक गटातून मॉडर्न पब्लिक स्कूल उमरखेड चे शिक्षक प्रदीप धोबे यांनी सुद्धा प्रथम क्रमांक पटकावला. उद्घानप्रसंगी संचलन प्रशांत मटपल्लेवार यांनी केले तर आभार ज्ञानेश्र्वर खांडरे यांनी मानले.
चौकट:गट शिक्षण अधिकारी सतिष दर्शनवाड यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रत्येक प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रश्न विचारत संवाद देखील साधला.