अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि. 24 डिसेंबर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंगोरी या शाळेत श्री छञपती राजर्षी शाहु बँक लि.बीड चे संस्थापक अध्यक्ष कै. अर्जुनराव जाहेर पाटील (अप्पासाहेब) यांच्या पुण्यस्मरणाच्या निमीत्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपकरण्यात आले.याबाबत सविस्तर वृत्त असे की,श्री छञपती राजर्षी शाहु बँक बुटीबोरी शाखेचे स्थानिकसल्लागार श्री.प्रशांत नागपुरे सर यांच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंगोरी जि.नागपूर येथे कै.अर्जुनराव जाहेरपाटील (अप्पासाहेब)यांच्या पुण्य स्मरणार्थ विद्यार्थ्यांना शैक्षणिक,शालेय व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी शाहु बँकेचे अध्यक्ष इंजि.श्री.अजय पाटील,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.बी.ई.पवार,शाखा समुहप्रमुख श्री.विजय कुमार मस्के,शाळेचे मुख्याध्यापक,डाॕ.मनोहर नरांजे,पंचायत समिती सदस्य पुष्करभाऊ डांगरे, सिंगोरी येथील सरपंच श्रीमती पुनम अवघडे, केंद्रप्रमुख छगनजी राणे, श्रीमती प्राजक्ता नागपुरे, सहशिक्षक श्री.मिलिंद शिंदे,श्री.प्रशांत नागपुरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.वासुदेव डुकरे तसेच गावकरी,बँकेच्या शाखेचे सभासद व शाखेतील सर्व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थीत होता.यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर कळसुले यांनी सर्वांचे आभार मानले.











