संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा सुकळवाड येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्री.प्रविण मोरजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि श्री.उत्तम गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.शिरवंडे सारख्या ग्रामीण भागात पालक, ग्रामस्थ, देणगीदार यांच्या सहकार्याने संस्थेने गेल्या तीस वर्षांत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली हे कौतुकास्पद आहे.शाळेच्या प्रगतीसाठी आपण सहकार्य करु असे उद्गार यावेळी श्री.प्रविण मोरजकर यांनी काढले.यावेळी श्री.मोरजकर यांचा संस्था व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.श्री.मोरजकर यांनी शाळेला १००००₹देणगी दिली.वार्षिक स्नेहसंमेलना निमित्ताने श्री.सत्यनारायण महापूजा, रांगोळी स्पर्धा, पारितोषिक वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.देणगीदारांनी बक्षीस ठेव योजनसाठी ठेवलेल्या कायमठेवीतून मिळणाऱ्या व्याजातून व इतर बक्षीस दात्यांनी दिलेल्या रक्कमेतून गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यात आली.या वर्षी कु.शिवम संतोष भोगटे व कु.कोमल भालचंद्र जंगले यांची आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या सन्मानासाठी निवड करण्यात आली.यावेळी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल श्री.काणेकर व्ही डी यांचा , मानधन तत्वावर काम करणाऱ्या श्रीमती प्रणिता गांवकर,सौ.सानिका बाक्रे यांचा संस्थेच्या व शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.गेली अनेक वर्षे अनेक सुसंस्कृत विद्यार्थी घडवून उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करणारे शाळेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.वामन तर्फे सर यांचा माजी विद्यार्थी श्री.रघुनाथ गांवकर आणि श्री.प्रवीण घाडीगांवकर (दोन्ही सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य)यांच्या संकल्पनेतून यथोचित सत्कार करण्यात आला . तसेच रत्नागिरी टाइम्सचे ज्येष्ठ पत्रकार श्री.लक्ष्मीकांत भावे यांचा सन्मान करण्यात आला.. यावेळी व्यासपीठावर शिरवंडे सरपंच सौ चैताली गांवकर, शालेय समिती सदस्य श्री.दिपक चव्हाण,श्री.दशरथ घाडीगांवकर, पोलिस पाटील श्री.आनंद तांबे,असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.सुशांत पाटील सर, श्री.रघुनाथ गांवकर, श्री.प्रवीण घाडीगांवकर, श्री.अजित घाडीगांवकर, श्री.जगदीश कासले, शिक्षकेतर संघटना कार्याध्यक्ष श्री.प्रदिप सावंत, श्री.सुरेश गांवकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी केले.सुत्रसंचलन श्री.काणेकर सर यांनी केले.तर आभार ज्येष्ठ शिक्षक श्री.सुभाष सावंत यांनी मानले.यावेळी मोठ्या संख्येने पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.










