कैलास शेंडे
तालुका प्रतिनिधी, तळोदा
तळोदा: बोरद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे मात्र संपाला १८ दिवस उलटले तरी राज्य सरकार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या व केंद्रातील लाभार्थ्यांच्या आहाराबाबत उदासीन असल्याची टीका होऊ लागली आहे.तळोदा तालुक्यातील बोरद ही मोठी ग्रामपंचायत असल्याने या गावांमध्ये एकूण ९ अंगणवाड्या असून ९ अंगणवाडीमध्ये साधारणतः ६५२ विद्यार्थी या ठिकाणी पोषण आहाराचा लाभ घेत असतात. आणि हसत खेळत आपले शिक्षण ही पूर्ण करत असतात मात्र गेल्या ४ डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने या संपाला १८ दिवस उलटले असून तेवढ्याच दिवसापासून या अंगणवाड्यांमध्ये प्रवेशित असलेले लहान बालके ही पोषण आहारापासून वंचित आहेत. अंगणवाड्या ९ असल्यामुळे प्रत्येक अंगणवाडीत साधारणतः ७२ ते ७४ मुलं आहेत या मुलांचा आहार गेल्या पंधरा दिवसापासून त्यांना मिळत नसल्याने पालक वर्गामध्ये ही नाराजी आहे. तसेच बालकांमध्येही उदासीनता दिसून येत आहे.त्याचबरोबर गरोधर स्त्रिया तसेच स्तनदा मातांसाठी अमृत आहार योजना देखील शासनाच्या वतीने सुरू आहे.अशात ६७ गरोधर स्त्रिया तसेच ९७ स्तनदा माता याठिकाणी या योजनेचा लाभ घेतात .ही संख्या कमी अधिक होत असते असे असलेतरी या योजनेचे लाभार्थी देखील गेल्या १८ दिवसापासून वंचित आहेत.यामुळे साहजिकच कुपोषनाचे प्रमाण वाढू शकते.
त्यामुळे शासनाने या संपाबाबत योग्य तो तोडगा काढावा असे लाभार्थी मुलांच्या पालकांच्या तसेच गरोधर माता यांच्या परिवाराच्या वतिने सांगण्यात येत आहे.