शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :महाराष्ट्र राज्य सहकारी संघ म.पुणे अतर्गत रा. पा. ना. सहकार प्रशिक्षण केंद्र छ. सभाजीनगर सह निबंधक सह सस्था यांचे तर्फे सहकार क्षेत्रातील विविध बँका मधील अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी स्वयंप्रेरणा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा दि.23/12/23 रोजी बँकेच्या मुख्य कार्यालया मध्ये सकाळी 11 वाजता उत्साहात संपन्न झाली. सहकार क्षेत्रातील बँक मधील कर्मचारी यांच्या करिता मार्गदर्शन व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात साईबाबा च्या मूर्ती पूजनाने झाली. या प्रसंगी प्रशिक्षक श्री डाँ. संजय औटी यांनी
प्रशिक्षणात सहकारी संस्थांमधील अधिकाऱ्यांची जबाबदारी,कर्तव्ये,
निधी व्यवस्थापन, रिजर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षित कर्ज वाटप व दस्तेवज, के. वाय. सि,आर्थिक पत्रके , आर्थिक साक्षरता, ऑडिट कामकाज पध्दती, कर्ज दस्तऐवज व नियमावली, आधुनिक मार्केटिंग तंत्रज्ञान अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रासाठी साईबाबा नागरी बँक चे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर अध्यक्षस्थानी होते व वाल्मिकी अर्बन ना सह बँक मु. का अधिकारी बाबासाहेब बिडवे प्रमुख उपस्थिती होती. आणि संचालक बालचंदाणी कन्हैयालाल, ऍड भगवान शिरसाठ, दत्तात्रय आंधळे आदि उपस्थित होते . प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारीअधिकारी रामराव लाडाने यांनी केले . प्रशिक्षण कार्यक्रम आढावा प्रा. आर.बी. देशमुख यांनी केले. या वेळी साठ कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हुगे यांनी केले तर आभार दत्ता पौळ यांनी केले.