सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
योगीराज कृषी केंद्र वरदडा फाटा (लव्हाळा) व ओझो अग्री केअर प्रा लि हैदराबाद यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी संत्रा या पिकाचे नियोजन कसे करायचे याविषयी चर्चासत्र आयोजित केले होते
लव्हाळा :दि :24 – 07 – 2021 रोजी लव्हाळा येथे संत्रा या पिकाचे मोठ्या प्रमाणात लागवड आहे आणि मार्गदर्शन कमी असल्याकारणाने शेतकऱ्याची बाग ही डेव्हलप होत नाही आणि आणि बागेत नफा कमी मिळतो हे लक्षात घेता योगीराज कृषी केंद्र वरदडा फाटा (लव्हाळा) आणि आणि ओझो अग्रिकेअर प्रा, लि हैदराबाद यांनी संत्रा तज्ञ यांच्याशी संपर्क साधला आणि संत्रा तज्ञ म्हणून अवघ्या महाराष्ट्राच्या ओळखीचे असणारे डॉ, प्रवीण बेलखेडे (संत्रा शास्त्रज्ञ) व मा. अमोल अवचार सर (ए एस एम) मुन्ना देशमुख (एस o) गजानन वाहक (एसटी) योगेश मानकर (एफ ए) अनिकेत वाघ (एफ ए) दीपक बोरे (कृषी सेवक) अंकुश सोळंकी (कृषी सेवक) उमेश लहाने (योगीराज कृषी केंद्र संचालक) व इत्यादी मान्यवर उपस्थित होते
या चर्चासत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन वर्षांमध्ये बाग डेव्हलप कसा करता येईल व कोणत्या अवस्थेत कोणते रासायनिक खते वापरावी लागतील याविषयी माहिती सांगितली आणि जास्तीत जास्त कसा नफा मिळेल याविषयी माहिती सांगितली डॉ. श्री प्रवीण बेलखडे (संत्रा शास्त्रज्ञ) यांनी चर्चासत्राला आलेल्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले











