निलेश किरतकार
मुख्य संपादक
अमरावती : आजच्या काळात कुठे काय घडेल. हे सांगता येत नाही म्हणून अत्यंत आभासी जगात माणूस जगत असतो अशा वेळी मानवी मनाचा ठाव घेणे खूप कठीण होते अशाच एका लघुपटाची निर्मिती फ्रेंड्स फोटोग्राफी या तरुणांच्या ग्रुप ने केलेली आहे. अत्यंत नवीन अशा कलाकृती ला सर्व कलावंतांनी मिळून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अशा “आभास हा” लघुचित्रपटाचे पोस्टर लाँच नुकतेच करण्यात आले.

” आभास हा” लघुचित्रपट चंद्रशेखर तरारे यांनी लिहिला व दिग्दर्शित केलेला असून प्रज्वल मेटे या तरुणाने यात मुख्य भूमिका साकारली आहे. वैशाली तरारे, अक्षय मालवे, तसेच बालकलाकार सुजल बागडे आदी कलावंतांनी सुद्धा या चित्रपटात अभिनय केला आहे. सुप्रसिद्ध मॉडेल रेणुका लोडम, अभिनेता हिमालय, अभिनेता आशिष वासनिक या सर्व कलावंत च्या उपस्थितीत आभास हा या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर, व रेणुका यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अक्षय वासनिक यांनी केले. अभिनेता प्रज्वल मेटे यांनी आभार मानले. पोस्टर लाँच च्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी करिता यश वासनकर, प्रज्वल बोबडे, प्रफुल्ल सोनवणे, अजित घुगे आदी सर्व फ्रेंड्स फोटोग्राफी च्या ग्रुपने प्रयत्न केले.











