विनोद कांबळे
चिफ ब्युरो मुंबई
मुंबई : महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत असतात.त्यांना आवश्यक त्या सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणां कार्यतत्पर असतात. यावर्षी मुंबई महापालिका,सर्वच यंत्रणांनी उत्तम व्यवस्था केली होती.आरोग्य व स्वच्छता, साफ-सफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडली होती,दक्षता घेण्यात आली.मुंबई महानगर पालिका व महेंद्र साळवे यांच्या पुढाकाराने ६ व ७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. आपली भूमी,चैत्यभूमी स्वच्छ भूमी अशा आशयचे फलक लावून संपूर्ण चैत्यभूमी,शिवाजी पार्क मैदानाची साफसफाई करण्यात आली.मुंबई महापालिकेच्या या स्तुत्य उपक्रमाला अनेक कार्यकर्त्यांनी उत्साह दाखवला.या स्वच्छता उपक्रमात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांचा मुंबई महानगरपालिकेचा प्रमाणपत्र देऊन जी नॉर्थचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सकपाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी महापरिनिर्वाण समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे,आरपीआयचे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,आंबेडकरी चळवळीतील नेते संजय भालेराव आदि मान्यवर उपस्थित होते.या अभिनव पर्यावरणपूरक उपक्रमात सुमारे ७० कार्यकर्त्यांनी श्रमदानात सहभाग घेतला.


