जंगल परिसरातुन ट्रॅक्टर द्वारे रेतीची दैनंदिन चोरी
विनोद शर्मा
तालुका प्रतिनिधि चिमूर
चिमूर : गुरुवार २१ ला पहाटेच्या 4.30 वाजताच्या सुमारास खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के वय 19 वर्षे या मजूर प्राप्त माहितीनुसार युवकाचा रेतीची वाहतुक करीत असतांना ट्रॅक्टर च्या चाकाखाली दबून मृत्यू झाला.घटनास्थळ पिटीचुवा फॉरेस्ट FDCM जंगल खडसंगी या क्षेत्रातील आहे.
आकाश सोनटक्के युवक व गावातील 6 मित्रां सोबत नेहमीच रांत्रीच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करण्याच्या कामावर मजूर होते प्रत्येक रांत्रोला सहा ते सात ट्रिप नेत असल्याने हि घटना पहाटेच्या सुमारात घडली मजूरांनी ट्रॅक्टर भरून गाडी खाली करण्यासाठी जात असल्याने काही अंतरावरच
आकाश सोनटक्के युवक ट्रॅक्टर वरुन खाली पडल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने मागच्या चाकामध्ये दबल्याने ट्रॅक्टर चालक रोशन जाधव यांच्या मोठ मोठ्या आवाजाने बाकीच्या मजूरानी धाव घेतली असता युवकाचा जागीच मृत्यू झाला होता तालुक्यात मोठया प्रमाणावर भर दिवसा व रात्रोच्या वेळेसच जंगल परिसर प्रादेशिक , बफर , FDCM , या जंगलातून चोरटे मार्ग तयार करून रेतीची चोरी केली जात आहे.
चिमूर ठाण्यातील उपनिरीक्षक सोरते कुणाल राठोर , सचिन खामनकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुण आपल्या आई वडिलांना एकटाच आहे
मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे


