सोपान सासवडे
ग्रामीण प्रतिनिधी अहमदनगर
आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय, शेवगाव या ठिकाणी आज थोर गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस गणित दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य श्री.संपतराव दसपुते, उपप्राचार्या श्रीमती रूपा खेडकर, पर्यवेक्षक प्रा . शिवाजी पोटभरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा गणित विषय प्राध्यापिका सविता फाटके, जेष्ठ प्राध्यापिका मंजुषा बुधवंत ,प्रा. रविंद्र आगळे ,गणित प्राध्यापिका वैशाली जाधव, शामल बोरुडे आदि मान्यवर उपस्थित होते .यावेळी गणित दिनाचे औचित्य साधून गणितावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा, पोस्टर स्पर्धा तसेच गणितीय रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला .विद्यार्थी प्रतिनिधी कु . वैष्णवी मुळक या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा . सविता फाटके मॅडम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील योगदान लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिवस गणित दिन म्हणून साजरा करण्यात येतो .विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती दूर करून आवड निर्माण करणे तसेच दैनंदिन जीवनातील गणिताचे महत्त्व समजावे हा गणित दिन साजरा करण्यामागे मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी देखील संशोधक वृत्ती जोपासून शास्त्रज्ञ बनावे. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रा . जरीना शेख व प्रा .सायली घोडेचोर यांनी केले तर आभार प्रा .वैशाली जाधव यांनी मानले .