राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : तालुक्यात संत्रा लागवड मोठ्या प्रमाणात आहे .परंतु जून 2023 मध्ये योग्य पाऊस न पडल्याने व पावसातील खंड त्यामध्ये अति तापमानामुळे तालुक्यातील 90% संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा बगीच्या मृग बहरला मुकला आहे .झाडास फळे लागले नसल्यामुळे पिक विमा कंपनीने मृगबहाराचा विमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा जमा करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत.आहे नैसर्गिक आपत्तीमुळे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसानीचे संरक्षण मिळावे म्हणून फळ पिकांना नुकसानीचे संरक्षण कवच लागू केले आहे.चालू वर्षी तालुक्यात साधारण 90% संत्रा बागेंना बाहेरच न आल्यामुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.त्या शेतकऱ्यांनी हवामान वर आधारित पिक विमा योजनेचा भाग घेतला परंतु विमा कंपनीचे लुटारू धोरण व सत्ताधाऱ्याची दुपटीपणा यामुळे शेतकऱ्यावर संकट उभे ठाकले आहे .विमा कंपनीवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे.तालुक्यात संत्रा ,मोसंबी, लिंबू ,मिळून एकूण सातशे हेक्टरचे जवळपास फळबाग लागवड असून संत्रा या पिकांना मे ,जून मधील पावसाचा खंड व अति तापमानामुळे बहार जळून 100% नुकसान झाले आहे .कंपनीचे कर्मचाऱ्याकडून पंचनामे सुद्धा झाले असून मृग बहारच शेतकऱ्याचे हातून निघून गेल्यामुळे पिक विमा कंपनीने तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सर्व शेतकरी संत्रा उत्पादक करीत आहे.


