अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील कारेगाव येथे श्रीक्षेत्र जगदंबा गड वर्धापन दिन तीन दिवशी सप्ताहाचे आयोजन करून उत्साहात पार पडला. या सप्ताहासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार गायक मंडळी उपस्थित होते श्री क्षेत्र जगदंबा गडाचे मठाधिपती महंत जगन्नाथ महाराज शास्त्री यांची कारेगाव ग्रामस्थांच्या वतीने रथातून मिरवणूक काढून त्यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी गावातील सरपंच उपसरपंच चेअरमन व्हाईस चेअरमन तोला मोलाचे सर्व पदाधिकारी व गोविंद पोटे विठ्ठल दहिफळे पांडुरंग दहिफळे कृष्णा दहिफळे अमोल दहिफळे संतोष भाबड अमोल बांगर संदीप दहिफळे शेषराव बोडके व अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.











