अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी संस्कार विद्या मंदिर मेडशी येथे संत गाडगेबाबा यांच्या 67 व्या पुण्यतिथी निमित्त संस्कार विद्या मंदिर मध्ये अभिवादन कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिगंबर श्रीराम घुगे होते त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वरूपाली पोदाडे मॅडम यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संस्कार विद्या मंदिर मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना संत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती दिली यावेळी शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन संत गाडगेबाबा महाराजांच्या जीवन चरित्र सांगितले यामध्ये वर्ग नर्सरी एलकेजी युकेजी पहिला दुसरा तिसरा वर्गाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी भाषण व वेशभूषा सादर केले तसेच वर्ग चौथा पाचवा सहावा सातवा आठवा या विद्यार्थिनींनी व विद्यार्थी यांनी स्वच्छ भारत स्वच्छ अभियान सुशिक्षिता व अशीशिक्षिता याचे फायदे व तोटे व अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध नाटिकेतून खूप चांगले संदेश दिले या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री दाहात्रे मॅडम व आभार प्रदर्शन मयुरी दाहात्रे मॅडम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी पार करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर व कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केले यामध्ये राठोड सर चतरकर मॅडम अंजुमन शहा मॅडम घुगे मॅडम घाटे मॅडम शबनम मॅडम खरात मॅडम व कर्मचारी फाजल परसु वाले गीता बिबे चोतमल ताई सर्व उपस्थित होते.