प्रल्हाद कोलते
तालुका प्रतिनिधी मोताळा
पोटा येथील ग्रामपंचायत सरपंच गोपाल शेलार यांचे पद रिक्त झाल्यामुळे त्यांनी हा राग मनावर धरून पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव आणून गावातील काही विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तेव्हा त्यांची नि:पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष भाई प्रज्ञावंत तायडे यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,गत काही दिवसांपूर्वी तरवाडी-पोटा गट ग्रामपंचायतचे सरपंच गोपाल शेलार यांचे विरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांचे सरपंच पद रद्द करण्यात आल्याचा निर्णय प्रशासनाकडून देण्यात आला. त्यामुळे आपली तक्रार केली हा राग मनात धरून त्यांनी गावातील काही लोकांविरोधात पोलीस स्टेशनला खोटी तक्रार देत पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या. हा सर्व प्रकार चुकीचा असून या सर्व प्रकरणाची सत्यता तपासण्यात यावी. अन्यथा सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी प्रल्हाद भाई कोलते तालुकाध्यक्ष मोताळा, रोशन भाई सरदार तालुका अध्यक्ष नांदुरा तालुक्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


