मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
त्रिवेणी मेमोरियल ट्रस्ट कुऱ्हा रोड डहाणेवाडी चांदुर रेल्वे द्वारा संचालित जिंगल बेल इंग्लिश स्कूल मध्ये दिनांक -19/12/2023 रोजी वर्ग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुका विधी सेवा समिती तसेच चांदुर रेल्वे दिवाणी न्यायालय, चांदूर रेल्वे तर्फे शाळेत कायदेविषयक शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चांदुर रेल्वे दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश सचिन शिंदे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा चांबटकर मॅडम, एडवोकेट ललित कदम पत्रकार विवेक राऊत आणि शाळा मुख्याध्यापक अतुल उज्जैनकर उपस्थित होते. या शिबिरामध्ये उपस्थित कायदेतज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांना तसेच विद्यार्थिनिना ‘पोस्को कायदा ‘आणि मुला – मुलींवर होणाऱ्या लैगिक शोषण या विषयावर मार्गदर्शन केले त्याचबरोबर युवा अवस्थेत पदार्पण केल्यावर भविष्यात उभ्या राहणाऱ्या आव्हानांना कशा पद्धतीने समोर जावे तसेच मानवी जीवनाला कायदे कसे बळकट बनवतात? याबद्दलकायदे तज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शाळेतील वर्ग आठवी नववी दहावीचे संपूर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना ढोरे तर आभार प्रदर्शन वर्ग दहावीची विद्यार्थिनी आरुषी चव्हाण हिने केले.