वसंता पोटफोडे
शहर प्रतिनिधी राळेगाव
राळेगाव: दि.१९ दरवर्षी प्रमाणे जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन माध्यमिक शिक्षण विभाग करीत असतो या वर्षी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी आयोजनाचा मान राळेगांव तालुक्याला मिळालेला आहे . या संदर्भात विचारविनीमय करून हि विज्ञान प्रदर्शनी श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविघालय झाडगांव येथे घेण्याचे ठरले आहे . याच जिल्हा स्तरीयविज्ञान प्रदर्शनी च्या यशस्वी आयोजना संदर्भात दि . १९ डिसेंबर २० २३ ला झाडगाव येथे सहविचार सभेचे आयोजन दुपारी १ वाजता करण्यातआले नियोजन व सहविचार सभेचे अध्यक्ष प्रदिप गोडे उपशिक्षणाधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक प्रमुख उपस्थिती कु निता गावडे, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक सतिष काळे प्रदेश महासचिव डॉ. पं दे . राष्ट्रीय शिक्षक परिषद,सतिष आत्राम केंद्र प्रमुख,महेश सोनेकर, प्रविण कोल्हे, मुख्याध्यापक . विलास निमरड प्रा जितेन्द्र जवादे यावेळी उपस्थीत होते . सभेचे संचलन विशाल मस्के यांनी केले नियोजन व सहविचार सभेला तालुक्यातील मुख्याधापक, शिक्षक उपस्थीत होते . उपशिक्षणाधिकारी प्रदिप गोडे यांनी विज्ञान प्रदर्शनीच्या . नियोजना संदर्भात माहिती दिली . यावेळी विविध समित्यांचे गठन करण्यात आले व समिती प्रमुखाची निवड करुन समित्याच्या कामाचे वाटप करण्यात आले . जिल्हा विज्ञान प्रदर्शनी दि २८ व २९ डिसेंबर या दोन दिवसीय असेल अशी माहिती शिक्षण विभागा यावेळी देण्यात आली तसेच . यशस्वी आयोजना साठी सर्व समित्यानी व तालुक्यातील शाळानी सहकार्य करावे असे आवाहन प्रदिप गोडे उपशिणाधिकारी यांनी केले आहे . आभार प्रदर्शन विलास निमरड मुख्याध्यापक यांनी केले… .