दिनेश आंबेकर
तालुका प्रतिनिधी जव्हार
जव्हार : दि.20.रोजी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा 2023 साखरशेत चालतवड येथे मोठया उत्साहात पार पडल्या.जव्हार तालुक्यातील 18 केंद्रातील विजेते संघ बीटस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या संघाना या स्पर्धेत सहभागी झाले होते. सदर सामने अतिशय चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या. कबड्डी,खो खो,लंगडी या सामुहिक खेळांबरोबार व्ययक्तिक सामनेही खेळवण्यात आले. जव्हार तालुक्याच्या सभापती विजया लहारे मॅडम, उपभापती मा. दिलीप पाडवी माजी जि. प चेअरमन हेमंत गोविंद, जि. प सदस्या बुधर मॅडम साखरशेत गावाच्या सरपंच श्रीमती अनिता चौधरी गट शिक्षणाधकारी पुंडलिक चौधरी सामाजिक कार्यकर्ते श्री दयानंद लहारे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. अत्यंत चुरशीच्या लढती या क्रीडा स्पर्धेच्या पहावयास मिळाल्या. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या चालतवड मध्ये कबड्डी,खो खो चा थरार पहावयास मिळाला.आता ग्रामीण भागात क्रिकेट चे वेड कमी होऊन कबड्डी,खो खो तसेच व्ययक्तिक खेळाकडे मुलांचा कल असल्याचं दिसून येतंय. साखरशेत केंद्राचे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री मधुकर भोये सर यांनी सदर क्रीडास्पर्धा भरवण्यासाठी मैदान व यजमान पद भुसावले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विस्तार अधिकारी सुरेश भोये साहेब, रामचंद्र भरसट साहेब व सर्व बी आर सी. स्टाफ यांचे मोलाचे योगदान मिळाले.शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री सखाराम पवार सर, व सर्व केंद्र प्रमुख यांनी सुरेख नियोजन केले होते..या स्पर्धेतून विजेते संघ जील्हा स्तरावर खेळवले जातील. साखरशेत शाळेचे मुख्याध्यापक, हरीचंद्र भोये सर यांची मोलाची साथ मिळाली.











