शिबिराचे स्थळ:- उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा
अनिल वेटे
तालुका प्रतिनिधी केळापूर
पांढरकवडा :- दी.२७ रोजी पांढरकवडा शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून पांढरकवडा तालुक्यासह शहरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मा.डॉ.तुरंगतुषार संजय वारे उपसंचालक अकोला मंडळ, मा.डॉ. सुखदेव राठोड जिल्हा चिकित्सक यवतमाळ, मा.डॉ. पी एस चव्हाण जिल्हा आरोग्य अधिकारी यवतमाळ, डॉ.वैशाली सातुरवार वैद्यकीय अधिकारी पांढरकवडा, डॉ.संजय मडावी तालुका आरोग्य अधिकारी पांढरकवडा, यांनी केले आहे.
रुग्ण तपासणी व भरती:- बुधवार २७/१२/२०२३ वेळ सकाळी ९ ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे,
शस्त्रक्रिया:- गुरुवार २८/१२/२०२३ व शुक्रवार २९/१२/२०२३
शस्त्रक्रिया पश्चात काळजी:-शनिवार ३०/१२/२०२३ रोजी दंतचिकित्सा शिबिरामध्ये तपासणी इत्यादी आजारावर उपचार करण्यात येणार आहेत.
पांढरकवडा तालुक्यासह शहरातील गरजू रुग्णांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येते आपली नाव नोंदणी करून घ्यावी फक्त नाव नोंदणी करावी. सर्व तपासण्या मोफत आहेत.
तरी पांढरकवडा तालुक्यातील, शहरातील गरजू रुग्णांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा यांनी केले आहे.