मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे: चांदुर रेल्वे पंचायत समिती अंतर्गत सातेफळ गणातील काल पार पडलेल्या पोट निवडणुकीत काँग्रेस व भाजप पक्षात चुरशीची लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत जनतेने भाजप उमेदवार नाकारत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रीती तिजारे यांना 409 मतांनी विजयी करत स्थानिक भाजप नेत्यांसोबत कार्यकर्त्यांची तीन राज्यात मिळवलेल्या यशाची नशा काही अंशी कमी केली. भाजपच्या पंचायत समिती सदस्य श्रद्धा वऱ्हाडे यांच्या राजीनाम्यानंतर सातेफळ 98 गणासाठी राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार पोट निवडणूक 17 डिसेंबर रविवार ला घेण्यात आली. 18 डिसेंबर सोमवारी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी साहेब यांच्या देखरेखीखाली चार टेबलवर मतमोजणी पार पडली. काँग्रेसच्या उमेदवार प्रीती तिजारे यांना 2918 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या शुभांगी भालकर यांना 2509 मते पडली. शिवसेना वं. ब. आ. च्या उमेदवार चौधरी यांना 474 मते पडली. तर 125 मतदारांनी NOTA ला मतदान केले. काँग्रेस उमेदवार प्रीती तिजारे यांना निवडणूक अधिकारी यांनी 409 मतांनी विजयी घोषित केले. सातेफळ गणातील पंचायत समिती सदस्य निवडणूक भाजप व काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठापूर्ण समजली जात होती.परंतू भाजपला तीन राज्यात मिळालेला विजय आणि स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्यातील नसलेला ताळमेळ या कारणाने भाजप ला पराभव स्वीकारावा लागला. भाजप तालुका अध्यक्ष यांचे गावात भाजप उमेदवाराला काँग्रेस पेक्षा 1 मत कमी पडले. माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप कोणतीही निवडणूक सहजपणे घेत नाहीत. आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी शेवटच्या क्षणा पर्यंत जोर लावतात ही गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. ही निवडणूक 2024मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे अशी चर्चा ग्रामीण जनतेत रंगली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसचे पं. स. सदस्य अमोल होले, श्रीनिवास सूर्यवंशी, युवा नेते परीक्षित जगताप यांनी अथक परिश्रम घेतले. (बॉक्स मध्ये घेणे ) भाजप नेत्यांची उतरवली जनतेने नशा – अमोल होले सदस्य पंचायत समिती, अध्यक्ष काँग्रेस कमिटी – चांदुर रेल्वे पंचायत समिती सातेफळ पोटनिवडणुकीत शेतकरी, शेत मजूर व गरीब जनतेने भाजप नेते व कार्यकर्ते यांची यशाची नशा उतरवली आहे. महाराष्ट्र सरकार शेतकरी हिताचे निर्णय न घेता मनमानी निर्णय घेत गरीब शेतकरी शेतमजूरांच्या विरोधात कामे करीत आहे.. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लोक राज्यात काँग्रेस व मित्र पक्षाचे सरकार तर मतदार संघात माजी आमदार प्रा वीरेंद्र जगताप यांना भावी आमदार म्हणून पाहत आहे. ही पंचायत समिती निवडणूक म्हणजेच काँग्रेसच्या यशाची सुरवात आहे.