शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू :19 डिसेंबर विद्यार्थिनींनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत,
जिद्द,चिकाटीने कसोशीने प्रयत्न करावयास हवे.आपण यशाच्या कितव्या शिखरावर आहोत यापेक्षा आपण माणूस म्हणून कसे आहोत हे महत्वाचे आहे.” असे प्रतिपादन लेफ्टनंट संघमेश शिवानी कैलास मलवडे यांनी केले.नूतन कन्या प्रशाला सेलू येथे आयोजित सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना लेफ्टनंट संघमेश मलवडे बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी रोहिदास मोगल,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे ,
लेफ्टनंट संगमेश मलवडे,कैलास मलवडे,शिवानी मलवडे,संगीता खराबे,सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमा पूजनाने झाली.
भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती मिळवलेल्या संघमेश मलवडे यांचा आणि पालक कैलास मलवडे आणि शिवानी मलवडे यांचाही शाल, श्रीफळ,पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कैलास मलवडे यांनी NDA मध्ये मुलींनाही सुवर्णसंधी असून विद्यार्थिनींनीही तयारी करावी या संदर्भात मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप रोहिदास मोगल यांनी केला तर सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी तर आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले.कार्यक्रमासाठी प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.