अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, केज येथे दुपारी २.०० वाजता करण्यात आले.
सदर कार्यकमाच्या अध्यक्षपदी श्रीमती एस.व्ही.पावसकर दिवाणी न्यायाधीश,
कनिष्ठ स्तर,केज या होत्या कार्यक्रमास श्री.एन.डी. गोळे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर,
केज,श्री.पी.व्ही.पाटील दुसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, केज,श्रीमती ए.टी.जगताप तिसरे सह दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर, केज तसेच वकील संघाचे अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ सर्वश्री एम.एस लाड, डी.आर.घुले,रोडेवार आदीची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकमाचे सूत्र संचालन विधीज्ञ एस.व्ही. मिसळे यांनी केले. कार्यकमाची प्रस्तावना विधीज्ञ डी.टी.सपाटे यांनी केली.यावेळी राष्ट्रीयग्राहक दिनाबाबत बोलताना तिसरे सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती ए.टी जगताप मॅडम म्हणाल्या की,दि.२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ग्राहक संरक्षण कायद्या मुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकार, उत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार, निवडीचा अधिकार, तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.या आधारे एखादया उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करून घेण्याचा हक्कनागरिकांना मिळू शकला तसेच या कायदयामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल टाकले गेले असल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक मानवी हक्क दिन या विषयावर बोलताना सह दिवाणी न्यायाधीशश्री.एन.डी.गोळे म्हणाले की,समाजातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे,तसेच व्यक्तीला सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी दि.१० डिसेंबर हा आंतर राष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षणाचाअधिकार,स्वातंत्र्य आणि सुरक्षेचा अधिकार,समानतेचा अधिकार या व अशा विविध प्रकारच्या अधिकाराबाबत यावेळी श्री.एन.डी.गोळे यांनी प्रकाश टाकला.आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीमती.एस.व्ही.पावसकर मॅडम यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन व जागतिक मानवी हक्क दिनाबाबत सविस्तर अशी माहिती सांगितली. शेवटी विधीज्ञ एस.एन. मुंडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास पक्षकार, विधिज्ञांसह ९० लाभार्थी उपस्थित होते.