अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव ता .19 – मालेगाव शहरातील ना ना मुंदडा उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमा मध्ये तंत्र प्रदर्शनी आज ता 19 रोजी पार पडली.या प्रदर्शनी मध्ये ना ना मुंदडा उच्च माध्यमिक व व्यावसायिक अभ्यासक्रम व वसंतराव नाईक एच एस सी व्होकेशनल कॉलेज किंहिराजा च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वतीदेवी व स्व सेठ नारायणदासजी मुंदडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या प्रदर्शनी चे उदघाटन मुंदडा विद्यालयाचे पर्यवेक्षक श्रीराम रोडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा देवेंद्रसिंह राजपूत , प्रा दत्तात्रय चव्हाण , प्रा मधुसूदन तोष्णीवाल प्रा विजय भोयर प्रा अरविंद गाभणे ,आर आर कळसे ,प्रा श्याम काटे ,प्रा रमेश राठोड ,प्रा संजय वाघमारे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना श्रीराम रोडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षणाची कास धरली पाहिजे.त्यामुळे प्रगती होउ शकते असे ते म्हणाले .या प्रदर्शनीत रंनिग व्हेकिल कौंटींग सिस्टीम ,बँकेची प्रतिकृती, मॅनूअली ऑपरेटिंग गार्डन पंप ,फॉर स्ट्रोक पेट्रोल इंजिन ,फॉर स्ट्रोक डिझेल इंजिन,विटांचे मॉडेल ,रिज ,हिप अँड व्हॅली रुफ मॉडेल ,व्यवसायाचा जमा खर्च ठेवण्यासाठी लागणारी लेखा पुस्तके ,प्रमाणके ,परिव्यय पत्रक आदी मॉडेलचा सहभाग होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन प्रा आनंद देवळे यांनी केले.
——-–—-
फोटो ओळीं – श्रीराम रोडे यांनी विचार व्यक्त केले