अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि.20 केज शहरातील मैत्री ऑप्टिकलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून केज तालुक्यासह शहरातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मैत्री ऑप्टिकलचे शंकर लांडगे व चंद्रकांत नेहरकर यांनी केले आहे.
शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ठीक १० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे, शिबिराचे ठिकाण मैत्री ऑप्टिकल जय भवानी चौक मेन रोड केज या शिबिरामध्ये डोळे तपासणी, कान,नाक,घसा, शुगर, दमा इत्यादी आजारावर उपचार करण्यात येणार आहेत.
या शिबिरामध्ये तज्ञ डॉ. प्रियंका विश्वनाथ आरबडवाड व समर्थ लॅबचे संतोष देशपांडे, गणेश नेहरकर यांच्यासह त्यांची टीम रुग्णांना रुग्णसेवा देणार आहेत.
केज तालुक्यासह शहरातील गरजू रुग्णांनी तात्काळ मैत्री ऑप्टिकल मोबाईल दूरध्वनी क्रमांक ९८३४८५६५६६ व ९४२००६३७७७ या क्रमांकावर संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी फक्त नाव नोंदणी करिता ५० रुपये फीस आकारण्यात आली आहे बाकी सर्व तपासण्या मोफत आहेत.
तरी केज तालुक्यातील, शहरातील गरजू रुग्णांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन शंकर लांडगे व चंद्रकांत नेहरकर यांनी केले आहे.











