सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
अक्राणी तालुक्यातील अस्तंबा येथील पोपट वसावे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अँड. के. सी. पाडवी, माजी मंत्री अँड. पद्माकर वळवी, जि.प.चे गटनेते रतन पाडवी, जि.प सदस्य सी.के.पाडवी, सिताराम राऊत, विक्रम पाडवी, विलास पाडवी, दशरथ वसावे, छगन पाडवी, यांनी त्यांचे अभिनंदन केले.