मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि:१९ डिसेंबर २०२३ गेल्या अनेक वर्षापासून बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिद्ध असलेले पंचम ज्योतिर्लिंग म्हणून परळी वैद्यनाथ मान्यता आहे.परंतु गेल्या अनेक वर्षापासून मागणी करूनही शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशीन आणि एम आर आय मशीन उपलब्ध नव्हत्या त्या गेल्या आठ दिवसापूर्वी रुग्णालयात कार्यान्वित झाले असून शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्तेअँड.मनोज संकाये यांच्या मागणीला यश आले आहे तसेच पाठपुरावा केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेबांचे आणि आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांचे आभार त्यांनी व्यक्त केले असून एम आर आय मशीन बाबतचा प्रस्ताव तयार करून त्वरित मशीन बसवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत त्यांनी २३ मार्च रोजी बातमी प्रसिद्ध करून त्या संदर्भात आरोग्य विभागाला निवेदन सादर केले होते त्या निवेदनामध्ये सिटीस्कॅन व एम आर आय मशीन बसवण्याबाबत निवेदन मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आले होते त्याच मागणीला यश आले आहे त्याबद्दल नागरिकाकडून आरोग्य विभागाचे कौतुक केले जात आहे.तसेच एम आर आय मशीन चा प्रस्ताव तात्काळ पाठवावा आणि मंजूर करून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.परळी शहरामध्ये धुळीचे साम्राज्य असून त्यामुळे विविध आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत होते खाजगी लॅब वाले लोकांची आर्थिक पिळवणूक करत होते आणि मोठा आजार असल्यास एम आर आय आणि सिटीस्कॅन काढण्यासाठी लातूर या ठिकाणी लोकांना जावे लागत होते त्या संदर्भात त्यांनी आवाज उठवला आणि निवेदन सादर केल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटीस्कॅन मशीन बसवण्यात आली आहे. सिटीस्कॅन काढण्यासाठी पाच सात हजारापर्यंत सामान्य नागरिकांना खर्च करावा लागत होता तो या मशीन आल्यामुळे वाचणार आहे आणि मोफत पणे सिटीस्कॅन करून लोकांना त्यावर इलाज करता येईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे सिटीस्कॅन मुळे अनेकांच्या आरोग्य विषयक समस्या सुटणार आहेत.