राजपाल बनसोड
ग्रामीण प्रतिनिधी दिग्रस
दिग्रस : भारतीय सुरक्षा व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या तसेच केंद्र शासनाच्या अनुमतीविना काही इस्लामी संस्था कडून धर्मावर आधारित हलाल सर्टिफिकेट व्यवस्था भारतात राबवली जात आहे .या बेकायदेशीर हलाल प्रमाणे उत्पादनावर उत्तर प्रदेश सरकारने बंदी आणली आहे.त्याचप्रमाणे देशभरात हलाल प्रमाणित उत्पादनावर बंदी आणावी ,तसेच येत्या 22 जानेवारी 2024 ला आयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे .त्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी संपूर्णपणे मद्य -मास मुक्त करावी अशा या मागण्याचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ संघटनाच्या वतीने दिग्रस येथील तहसीलदार सौ .स्नेहल देशमुख यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पूर्वी हलाल व्यवस्था केवळ मांसाहारी पदार्थ पुरती आणि मुसलमान देशात निर्यातीपूर्ती मर्यादित होती मात्र धर्मनिरपेक्ष भारतात सध्या काही खाजगी कट्टरतावादी इस्लामी संस्थान कडून धान्य ,फळे ,खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने ,औषधे रुग्णालय ,गृहसंस्था, मॉल डेंटिंग साईट आदी सर्वच क्षेत्रे हलाल सर्टिफाइड करून हिंदू व्यापाऱ्यांचे शोषण केले जात आहे.भारत शासनाच्या अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) या अधिकृत संस्थेकडून प्रमाणपत्र घेतलेले असतानाही व्यापाऱ्यांना आवश्यकता नसतानाही प्रत्येक उत्पादनासाठी 47 हजार रुपये शुल्क भरून हलाल प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे .तसेच नूतनीकरणासाठी दरवर्षी वीस हजार पाचशे रुपये द्यावे लागत आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा पैसा आपल्या देशात बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत असलेल्या सातशे आतंकवाद्यांना कायदेशीर सहाय्य करण्यासाठी वापरला जात आहे.हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे.तसेच केवळ 15 %लोकांसाठी 85% लोकांवर हलाल उत्पादने हा धार्मिक अन्याय आहे येत्या 22 जानेवारी 2024 ला अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे.त्यामुळे देशभरातून कोट्यावधी हिंदू हे भगवान श्रीरामाचे दर्शन करण्यासाठी अयोध्येला पोहोचणार आहे .मंदिरे ही हिंदू धर्माची आधारशीला आहेत .या मंदिराचे पावित्र्य जपणे हे प्रत्येक हिंदूंचे धर्म कर्तव्य आहे हरिद्वार आणि ऋषिकेश येथेही मद्य- मास यावर 100% बंदी आहे याच धरतीवर अयोध्या नगरी संपूर्णपणे मद्य -मासमुक्त करावी अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष रवी अरगडे ,प्रमोद बनगिनवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संकेत दातीर शिवते संघटनेचे पांडुरंग दारोळकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शुभम गावंडे ,हिंदू जनजागृती समितीचे सुशील जोशी ,बाहेकर आधी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.