वसंता पोटफोडे.
शहर प्रतिनिधी राळेगाव.
राळेगाव :शेतकऱ्यांच्या कापसाची खाजगी व्यापारी कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची लुट करीत असल्याने केंद्र शासनाच्या वतीने सीसीआय मार्फत कापुस खरेदी करण्यात येत आहे परंतु राळेगाव तालुक्यातील खैरी येथील कापुस खरेदी केंद्रावर अधिकारी कापुस खरेदी करण्यास नकार दिल्याने सिसीआय व व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप करीत मनसेने या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक होत मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी कापसाची होळी करून संताप व्यक्त केला.
एकेकाळी पांढरे सोने पिकविणाऱ्या जिल्ह्याची ओळख साता समुद्रापार पोहचुन कापुस उत्पादक शेतकरी सुखी समाधानी राहू लागला परंतु शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या व्यापारी जमातीला हे पहावले न गेल्याने त्यांनी आपली वक्र दृष्टी जिल्ह्यावर फिरवुन कमी दराने कापुस व इतर शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांची लूट सुरू केली याबाबत शेतकऱ्यांनी आवाज उठविला तरी ही निराशाच शेतकऱ्यांच्या पदरी पडत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपाविली त्यामुळे जिल्ह्याची आत्महत्या ग्रस्त म्हणून जगाच्या नकाशावर कुप्रसिध्दी झाली अखेर केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा कापुस खरेदी करण्याचा निर्णय घेत सिसिआय मार्फत हमी भावाने खरेदी सुरू केली परंतु राळेगाव तालुक्यातील खैरी सी.सी.आय.च्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस ओला असल्याचे कारण देत सी.सी.आय अधिकाऱ्यांनी कापुस घेण्यास नकार दिल्याने शेतकऱ्यांनी बाहेर आपला कापुस खाजगी व्यापाऱ्यांकडे विक्री साठी नेला असता फक्त ६४०० प्रती क्विंटल रुपये भाव देत असल्यामुळे सिसिआयच्या व्यापारी धार्जिण्या धोरणांचा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट निषेध व्यक्त करीत कापुस खरेदी केंद्रावरच जाळुन सीसीआय चे अधिकारी व व्यापाऱ्यांची मिलीभगत असल्याचा आरोप केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवुन शेतकऱ्यांचा कापुस शासनाच्या हमी भावा प्रमाणे खरेदी करण्यात यावा. तालुक्यांतील
कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी आपला कापुस १०,००० प्रति क्विंटल विकला परंतु निसर्गाचा अवलहरी पणा यामुळे दुबार तिबार पेरणीमुळे खर्च दुप्पट झाला व भाव अर्धा झाला असल्याने शेतकऱ्यांच्या कापसाची शासनाच्या हमी भावाने खरेदी करणे अपेक्षित असताना अधिकारी मात्र मुद्दाम त्रुटी काढून शेतकऱ्यांचा कापुस खरेदी न करता खाजगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी कापुस विकला पाहिजे यासाठी हा सर्व खटाटोप करीत आहेत त्यामुळेच या अधिकाऱ्यांच्या व्यापारी धार्जीण्या वृत्तीचा निषेध करून कापसाची होळी केली शासनाने याकडे लक्ष घालुन शेतकऱ्यांचा कापुस विना अट खरेदी करावी अन्यथा या मनमानी विरोधात मनसे स्टाईल ने शेतकरी हितासाठी आंदोलन करू.
: शंकर वरघट मनसे जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ .











