शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
संगमेशच्या निवडीचा आनंदोत्सव साजरा.
सेलू : वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी सेलू येथील संगमेश शिवानी कैलास मलवडे भारतीय सैन्य दलात (इंडियन आर्मी ) लेफ्टनंट पदी दाखल झाले आहेत. सेलू शहरातून एन डि ए मार्फत थेट लेफ्टनंट पदी दाखल होण्याचा मान संगमेशला मिळाला आहे.संगमेशची आई शिवानी आणि वडिल कैलास मलवडे दोघे पण शिक्षक आहेत.संगमेशचे शिक्षण सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठाण संचलित प्रिन्स इंग्लिश मध्ये झाले. छत्रपती संभाजी नगरच्या सैनिकी पूर्व प्रशिक्षण संस्थेत राहून पुढील शिक्षण पूर्ण केले.खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील चार वर्षाच्या प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील आयएमएम मध्ये खडतर प्रशिक्षण पूर्ण केले.9 डिसेंबर रोजी संगमेशची लेफ्टनंट पदी निवड झाली. सेलू तालुक्यासाठी ही अभिमानाची व भूषणाची बाब असल्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सेलूकरांच्या वतीने रेल्वे स्टेशन पासून संगमेशची ढोल ताशाच्या निनादात आनंदोत्सवात मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व पुष्पहाराने अनेक मान्यवरांनी उत्स्फुर्तपणे स्वागत व अभिनंदन केले.रेल्वे स्थानकावर आई शिवानी वडिल कैलास व संगमेशचे संजीवनी हुगे, सान्वी हेलसकर, सई कुलकर्णी यांनी औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. माजी नगराध्यक्ष विनोदरावजी बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,श्रीराम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे,नूतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,साईराज बोराडे,नगरसेवक मनीष भाऊ कदम, गटकल कॅरिअर अकॅडेमी चे रामेश्वर गटकळ, कॅप्टन जे.पी.शर्मा, रमेश काकडे, डॉ. शिवाजी शिंदे,प्रा.के.डी. वाघमारे, शिवा संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार नावाडे सचिव निजलिंगअप्पा तरवडगे,जयंत दिग्रसकर, सेवानिवृत्त संघाचे डॉ. गंगाधर गळगे,नारायण इक्कर, प्रशांत माणकेश्वर, ह.भ.प.बाळू महाराज गिरगावकर, आनंद बाहेती, माणिक डख, डॉ. अनिल शेळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी सत्कार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मिरवणुकीस सुरुवात झाली. यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर,चंद्रशेखर मुळावेकर, पवन आढळकर,प्रशासकीय अधिकारी रामराव लाडाने साहेब,ऍड.भगवानराव शिरसाट आदिनी सत्कार केला.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणूक नूतनरोड मार्गे निघाली.दरमान्य धनलक्ष्मी महिला सहकारी नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.बांधकाम सभापती अशोकनाना काकडे व कर्मचारी यानी संगेमेश अभिनदन व सत्कार केला.त्यानंतर नूतन विद्यालय येथे श्रीरामजी भांगडिया यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नूतन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया,सचिव डॉ. विनायकराव कोठेकर,सहसचिव जयप्रकाशजी बिहानी,नंदकिशोरजी बाहेती,संतोष पाटील, सौ.संगीता खराबे,रोहिदास मोगल,आदिनी सत्कार केला. त्यानंतर मिरवणूक क्रान्ति चौक वरून ग्रामदैवत श्री गोपाळकृष्ण केशवराज बाबासाहेब महाराज मंदिरातील श्रीच्या चरणी प्रार्थना करून के.बा.विद्यालय येथे संस्थेचे सचिव महेश खारकर,मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर आदिनी स्वागत करुन सत्कार केला. लहानपणापासूनच संगमेशला सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होत.त्यासाठी संगमेशने जिद्द,चिकाटी आणि सातत्याने प्रयत्न करून प्राप्त केले.यासाठी अनेकदा खडतर प्रसंगातून स्वतःला सावरून स्वतःच अस्तित्व निर्माण करू न आपल्या ध्येयापासून थोडेही विचलीत न होता कायम जिद्द,अथक परिश्रम व कुठल्याही परिस्थितीत न डगमगता हे यश खेचून आणले.अश्या भावना संगमेशचे वडील कैलास मलवडे यांनी आपल्या भावना व्यक्त करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. सूत्र संचालन सुभाष मोहकरे यांनी केले. मिरवणूकी साठी शंकर राऊत,बाबासाहेब हेलसकर,डॉ. शिवाजी शिंदे, एकनाथ जाधव, भालचंद्र गांजापूरकर,
शशीकांत देशपांडे,डॉ. अनिल शेळके, अशोक लिंबेकर,बन्सीधर पद्मावत, अनिल रत्नपारखी,सुभाष मोहकरे, उल्हास पांडे,अशोक मलवडे, मनोज कांदळे,विलास मलवडे,विश्वनाथ हुगे, बाळासाहेब क्षीरसागर आदिसह सर्व मित्रमंडळीनी परिश्रम घेतले. मिरवणूकी मध्ये गटकळ अकॉडमीचे विद्यार्थी, अनेक सामाजिक,शैक्षणिक संस्था, संघटना,पदाधिकारी,पुरुष,महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
चौकट :
मामा आनंद आणि मंजुनाथ,आजी आजोबा यांच्या कडून मिळालेल्या प्रेरणांना आई वडीलांनी सतत प्रोत्साहन दिले. वेळोवेळी शिक्षकांचे व मित्रांचे मार्गदर्शन लाभले असे मत संगमेशने व्यक्त केले.











