व्येकटेश चालुरकर
तालुका प्रतिनिधि अहेरी
अहेरी एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथे जय सेवा क्रीडा मंडळाकडून आयोजित भव्य ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष व माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आला.या उदघाटन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून जारावंडी ग्राम पंचायत च्या सरपंचा सपनाताई कोडापे तर प्रमुख पाहुणे म्हणून जारावंडी उपसरपंच सुधाकर टेकाम,माजी सरपंच हरिदासजी टेकाम,वासुदेवजीकोडापे,दयारामजी सिडाम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले,सरखेडा उपसरपंच रमेश दुग्गा,ग्रामसेवक मडावी साहेब,भूमिया मोतीराम मडावी,सिरपूर पोलीस पाटील उईकेजी,वंदनाताई मोहूर्ले संचालिका आविका संस्था,कांदळी पोलीस पाटील नारायण मडावी,प्रतिष्ठित नागरिक रामाजी टेकाम,प्रतिष्ठित नागरिक बाजीराव वेळदा,नरेंद्र कुमोटी ग्रामसभा अध्यक्ष वडसा खुर्द,नरोटेजी पोलिस पाटील इरपण पायली,दुग्गा जी पोलिस पाटील कुमरवाडा,आविस तालुका उपाध्यक्ष श्रीकांत चिप्पावार,प्रा.राजेश हजारे,मानकु नरोटे,वनरक्षक पंढरे जी सह आविस व बीआरएस चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी कबड्डी खेळाविषयी उपस्थित खेडाळु व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले कबड्डी सामन्यासाठी प्रथम पुरस्कार माजी आमदार दिपकदादा आत्राम व सौ अनिताताई दिपकदादा आत्राम माजी जि.प.सदस्या यांच्याकडून असे एकूण तीन बक्षीस ठेवण्यात आले.जय सेवा क्रीडा मंडळा कडून आयोजित भव्य कबड्डी सामन्याचे उदघाटनीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेवानिवृत्त शिक्षिका तोडासे मॅडम यांनी मानले.या कबड्डी सामन्याचे उदघाटनीय सोहळ्याला जारावंडी, कांदळी सह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सामन्याच्या यशस्वीतेसाठी प्रशांत टेकाम,युवराज मडावी,सुमित टेकाम,वेदांत कोडापे,संदीप मडावी,मोहित मडावी,आदित्य मडावी रोहित मडावी,सुरोजीत मंडल,चंदू पोटावी यांनी परिश्रम घेतले.