पंकज चौधरी
तालुका प्रतिनिधी रामटेक
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत स्थरावर काम करणाऱ्या सर्वच कर्मचारी संघटना यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले आहे.त्यात प्रामुख्याने ग्रामसेवक युनियन,संगणक परिचालक,ग्रामरोजगार सेवक व अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामपंचायत सदस्य यांनी संयुक्तरित्या आपल्या विविध मागण्यांच्या लक्षवेधीसाठी दि.१८ ते २० डिसेंबर या ३ दिवसीय कामबंद आंदोलन पुकारले आहे.
ग्रामपंचायत ही ग्रामस्थरावर गावाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा भाग आहे.आणि या ग्रामपंचायतच्या प्रत्येक स्थरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या प्रलंबित ठेवल्या जात आहेत.ह्या सर्व प्रलंबित मागण्या सरकारने मान्य कराव्या अशी सर्व ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या कर्मचारी संघटनांची आहे.
यावेळी रामटेक पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जयसिंग जाधव यांना ग्रामसेवक युनियन तर्फे निवेदन देऊन कामबंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.यावेळी ग्रामपंचायत युनियन संघटनेचे अध्यक्ष लीलाधर सोनवाने,उपाध्यक्ष मुकुंदा मरसकोल्हे,सचिव निवृत्ती नेवारे यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामसेवक युनियनचे सर्व सदस्य व विविध संघटनांचे कर्मचारी उपस्थित होते..











