चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्याआधीच संपल.
फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर तालुक्यातील कल्याण महामार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात झाला.त्यात संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमावावा लागला.दोन चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्या अगोदरच त्यांना या जगातून निरोप घ्यावा लागला त्यामुळे संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा येथे रविवारी रात्री १०:३० च्या सुमारास भीषण तिहेरी अपघात झाला आहे. या अपघातात माळशेज घाटाशेजारी असणारे मढ या गावात राहणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथून मेव्हणीच्या लग्नावरून रात्री उशिरा घरी परतत असताना त्या कुटुंबावर काळाने घाला घातला.गणेश उर्फ ओमकार मस्करे वय.३० वर्ष,कोमल मस्करे वय. २५ वर्ष हर्षद मस्करे वय ४ वर्ष, काव्या मास्करे वय ६ वर्ष सर्व रा.मढ तालुका जुन्नर येथील स्थानिक रहिवासी आहे.तसेच त्यांच्याकडे कामाला असणारा अमोल मुकुंदा ठोके,रा.जालना व रिक्षा मधील नरेश नामदेव दिवटे वय ६६ रिक्षा (चालक राहणार) रा.पेडे परशुराम ता.चिपळूण जि.रत्नागिरी इतर दोन अज्ञात इसमांची ओळख पटली असून समर्थ मकरंद खिरे वय वर्षे १६व मकरंद मधुकर खिरे ,वय वर्षे ५४ रा:-मुंबई उपनगर अशी आहेत.गणेश मस्करे हे आपल्या.कुटुंबासोबत आपल्या मेव्हणीच्या लग्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी या गावी गेले होते. लग्न आटोपून ते रात्री उशिरा आपल्या घरी परतत होते. ते भाजीपाला व्यावसायिक असल्याने त्यांनी पीक अप गाडी भरली होती. आपल्या कुटुंबाला घरी सोडून ते नेहमीप्रमाणे टोकावडे याठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी जाणार होते. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. ते आपल्या घरी पोहचण्याअगोदरच पिंपळगाव जोगा व डिंगोरे हद्दीतील सीमेवर अंजिराची बाग या ठिकाणी त्यांचा गाडीला भीषण आपघात झाला आहे.मस्करे कुटुंब हे गावातील अतिशय प्रामाणिकपणे काम करणारे कुटुंब होते.ते गावातील स्थानिक रहिवाशी असल्याने सर्वांशी त्यांचा चांगला सलोखा होता.मात्र त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे. या अपघाताचे सीसीटिव्ही आता समोर आले आहेत. –:कसा झाला अपघात:– आळेफाटाकडून भाजी पाला घेऊन पीक अप नंबर एम.एच.१४.एच.जी.१९४० ही ओतूर बाजूकडून कल्याण बाजूकडे जात असताना कल्याण बाजूकडून ओतूरकडे येणारी प्रवासी रिक्षा नंबर एम.एच.०३. बी . वाय.९०२३.यांच्यात डिंगोरे व पिंपळगाव जोगा गावच्या सीमेवर नगर कल्याण हायवे रोडजवळ असणारे पेट्रोलपंपा समोर रिक्षा तिच्या ट्रॅकवरून जात असताना वरील रिक्षाला पिकअप हा रिक्षाच्या ट्रॅकवर येवून रिक्षास जोरदार धडक मारल्यामुळे रिक्षामधील चालक व २ प्रवासी यांचा मृत्यू झाला. तसेच पिकअप चालक स्वतः व कॅबिनमध्ये बसलेली त्याची पत्नी मुलगा,मुलगी व मागे बसलेला हमाल असे सर्वजण पिक अप ही जोरात स्पीड ने डाव्या बाजूस पडून घसरत जावून कल्याण बाजूकडून येणाऱ्या ट्रक नंबर एम.एच.२६.डी.सी.११६० यास धडक बसून अपघात होऊन अपघातात पिकअप मधील ५ जण रिक्षा मधील ३ जण असे एकूण ८ जण जागीच मृत झाले आहे.ही माहिती समजतात जुन्नरचे डी.वाय.एस.पी. रविंद्र चौधर वओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.