चोहोट्टा बाजार येथे वाल्मिकी पायी दिंडी सोहळा चे भव्य स्वागत…
शरद भेंडे तालुका प्रतिनिधी अकोट
श्री महर्षी वाल्मिकी पायी दिंडी सोहळा दि:-१२/१२/२०२३ ते दि:-१९/१२/२०२३ श्री.गजानन महाराज संस्थान शेगाव येथे पोहोचणार आहे. या मध्ये २००पुरुष व २५० महिला मंडळी पायी दिंडीत सोहळ्यात सहभागी झाले आहे. पायी वाटचालीचा मार्ग खालखोनी, आमला, थिलोरी, दर्यापूर, सामदा काशिपुर, लोतवाडा, जऊखेडा, चोहोट्टा बाजार येथे रात्रीचे मुक्काम व भोजणाची व्यवस्था ,माजी सरपंच निताबाई दिलीपराव वडाळ यांनी केली. त्यानंतर ह.भ.प. पार्वतीताई महाराज पवार यांचे हरिकिर्तन झाले आहे. ताईनी पायी वारिचे महत्व सांगतांनी तरुण मुलांनी व्यसना पासुन व मुलींनी फॅशन पासुन दुर रहावे. आणी संतांचे विचार जिवणा मध्ये उतरुन आचरणात आणावे. अशा विविध विषयांवर समाज प्रबोधन केले. दुसऱ्या दिवशी श्री रामदासजी वडाळ यांनी चहापाणी दिले. नंतर लाजुरवाडी येथे चेतन विजयराव तुरूक यांनी चहाफराळ सेवा केली. त्यानंतर हनवाडी करिता दिंडी प्रस्थान झाली. अंदुरा, लोहारा, ऩतर रात्री भोजण व मुक्काम संत गजानन महाराज संस्थान शेगाव दि:-१९/१२/२०२३ ला सकाळी ९ ते ११ .ह.भ.प. कश्यप महाराज जळगावकर यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर .मा. उमेश पाटील पि.आय. साहेब खालखोनीकर यांच्या वतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. पायी दिंडी सोहळ्यात किर्तन व गायक मंडळी म्हणुन .ह.भ.प. रामायणाचार्य रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर, ह.भ.प. गोलू महाराज निमकर, ह.भ.प. वशिष्ठ महाराज देशमुख, ह.भ.प. ह.भ.प. पार्वतीताई महाराज पवार,. प्रभाकर महाराज राणे, दिनेश भारसाकडे ,हनुमान वाकडे, योगेश भिसे ,इत्यादी मंडळी उपस्थित आहे. वाहणसेवा म्हणुन . राजु रौराळे सरमसपुर, . युवराज वानखडे, सागरभाऊ ढोरे खोलापुर अशी माहिती महर्षी वाल्मिकी दिंडीचे प्रमुख संचालक ह.भ.प. रविंद्र महाराज पाटील खालखोनीकर यांनी दिली आहे…