सुरतान पावरा
तालुका प्रतिनिधी अक्राणी
अक्कलकुवा मोलगी रस्त्यावरील देवगोई हा घाट प्रवाशांसाठी नेहमीच संवेदनशील आहे.या घाटात रात्री अक्कलकुवाहुन मोलगीकडे जाणारे वाहन (क्र.एम एस एजे-५८४६ ) याला अपघात झाला. भरत रुपा वसावे, जितेंद्र अमरसिंग वळवी व रवींद्र धनराज चव्हाण हे तिघे किरकोळ जखमी झाले आहे. या घाटात संरक्षण कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढ झाली आहे. अपघात ग्रस्त जागेत नेहमीच संरक्षण कठड्यांची उणीव भासते. तेथे कठडे राहिले असते. अपघाताला आळा बसणार आहे. अक्कलकुवा मोलगीकडे देवगोई घाटात संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे.


