अमोल सावंत
तालुका प्रतिनिधी केज
दि.१६ डिसेंबर २०२३ रोजी शनिवारी तालुका विधी सेवा समिती व वकील संघ केज यांच्या संयुक्त विद्यमाने कायदे विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन उपजिल्हा रूग्णालय, केज येथे सकाळी १०-०० वाजता करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरूवातीस महा-युवा संवाद एचआयव्ही,एड्स जन जागरण अभियानाबाबत माहिती देणारे क्युआर कोडचे उदघाटन न्यायीक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी न्यायाधीश श्री.एन.डी. गोळे,श्री.पी.व्ही.पाटील सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर,केज हे होते.
या कार्यक्रमास वैद्यकीय अधिक्षक डॉ.डी.आर.केंद्रे, डॉ.मुंडे,आयसीटीसी कॉन्सेलर श्रीमती शोभा साकसमुद्रे,जेष्ठविधिज्ञ डी.टी.सपाटे,एस.व्ही. मिसळे यांच्यासह ईतर विधिज्ञांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकमाचे सूत्रसंचालन विधिज्ञ एस.व्ही मिसळे यांनी केले.कार्यकमाची प्रस्तावना श्री.डी.टी.सपाटे यांनी केली.यावेळीश्रीमती शोभा साकसमुद्रे यांनी एड्स (एच.आय.व्ही.) रोगाविषयी महत्वपूर्ण अशी माहिती उपस्थितांना दिली त्या म्हणाल्या की, एच.आय.व्ही.रोगाविषयी भीती न बाळगता त्याची पूर्ण माहिती घेवून जर याचा उपचार केला गोळया,औषधे नियमित पणे घेतले तर या रोगा पासून सुटका होवू शकते. तसेच एकापेक्षा अधिक व्यक्तीशी असुरक्षित शारीरिक संबंध केला असल्यास,गुप्तरोग झाला असल्यास,टीबी झाला असल्यास,महिला गरोदर असल्यासएच.आय.व्ही.ची तपासणी न चुकता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले. तसेच पुरूषांमध्ये व स्त्रीयांमध्ये एच.आय.व्ही ची लक्षणे कशी ओळखायची याबाबतही त्यांनी यावेळी माहिती सांगितली पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, एचआयव्ही बाधितांना इतरांनी चांगली वागणूक देण्याची गरज आहे तसेच एचआयव्ही बाधितांना संजय गांधी योजने मधून ही मदत केली जाते व त्याचा फायदा बाधितांनी घ्यावा असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात दुसरे सह दिवाणी न्यायाधीश श्री.पी.व्ही.पाटील यांनी दिव्यांगावर सविस्तर अशी माहिती सांगितली.ते म्हणाले की,समाजाने दिव्यांग व्यक्तीवर त्यांच्या दुर्बलतेची जाण करून न देता त्यांचा आदर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे.तसेच दिव्यांगाच्या बाबत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा फायदा त्यांनी घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.तसेच अंध व्यक्ती साठी बोटांच्या सहायाने वाचनाची पद्धत,ब्रेललिपी विकसित केलेल्या लुईस ब्रेल यांनी ब्रेल लिपी तयार केली.तसेच पाय नसताना ही दिव्यांग व्यक्तींनी माउंट एव्हरेस्ट सर केले आहे याचे उदाहरण देत त्यांचे कार्य बघून प्रेरणा घेवून दिव्यांगांनी आपली पुढील यशस्वीतेची वाटचाल करावी असेही ते म्हणाले,
शेवटी श्रीकृष्ण नागरगोजे यांनी आभार मानले. कार्यक्रमास रूग्णालया तील रूग्ण,नर्सेस,महिला आदी उपस्थित होते.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)